

Mohol Civic Election Sees 71.72% Turnout; Candidates Brace for Tight Results
Sakal
-राजकुमार शहा
मोहोळ : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अत्यंत चुरशीने मतदान पार पडले. किरकोळ प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. एकूण 24 हजार 413 मतदारा पैकी 17 हजार 509 एवढ्या मतदारांनी मतदान केले, त्याची टक्केवारी 71.72 टक्के एवढी आहे. दरम्यान दरम्यान बुधवार ता 3 रोजी होणारी मतमोजणी न्यायालयाच्या निर्णया मुळे ता 21 डिसेंबर रोजी होणार असल्याने अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. तर उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.