

Police Crack Down on Chain Snatchers in Mohol as Festive Season Begins
-राजकुमार शहा
मोहोळ : दिपवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मोहोळच्या बाजार पेठेत विविध वस्तू खरेदी साठी गर्दी वाढू लागली आहे. खरेदी साठी ग्रामीण भागातील कुटुंबे मोहोळ शहरात येतात. बाजार पेठेत खरेदी साठी आलेल्या ग्राहकांना मनमोकळे पणाने खरेदी करता यावी, त्यांची चोरी होऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी बाजार पेठेत, कृषी उत्पन्न बाजार समिती, नरखेड व शेटफळ या ठिकाणी गणवेशधारी व साध्या वेशातील पोलिसांची गस्त सुरू केली असून, महिलांच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग चोरा विरोधात मोहीम तीव्र केली आहे.