

Solapur Crime
सोलापूर: होटगी रोडवरून सातरस्त्याकडे जाणाऱ्या भरधाव कारची चालकाचे नियंत्रण सुटल्याने आयशर टेम्पोला धडक झाली. त्यात ईदगाह मैदानाजवळील नाल्यात कार उलटली. त्यावेळी मदतीसाठी आलेल्या महिला वाहतूक पोलिस अंमलदाराचा विनयभंग करून शासकीय कामांत अडथळा आणला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.