

Solapur
esakal
सोलापूर: उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही हवामान दिवसांत मॉन्सूनपूर्व पावसाची शक्यता विभागाने वर्तवली असली, तरी शेतकऱ्यांनी अपुऱ्या पावसावर पेरणीची घाई करू नये, असा इशारा कृषितज्ज्ञांनी दिला आहे. शेतात पुरेशी ओल निर्माण झाल्यानंतरच पेरणी करावी, अन्यथा दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते.