Solapur News : मंगळवेढ्यात महावितरणची मनमानी जळालेला ट्रान्सफॉर्मर बदलून देण्यास चालढकल

महावितरण कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे वीज बिल भरून देखील ट्रान्सफरवर बदलून देण्यास अधिकाऱ्याकडून चालढकल
msedcl Mahavitran mismanagement Mangalvedha to replace burnt transformer electricity solapur
msedcl Mahavitran mismanagement Mangalvedha to replace burnt transformer electricity solapursakal

मंगळवेढा : महावितरण कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे वीज बिल भरून देखील ट्रान्सफरवर बदलून देण्यास अधिकाऱ्याकडून चालढकल होत असल्याकडून असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान होत असल्यामुळे महावितरणच्या गलथान कारभाराबद्दल शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.

तालुक्यात शेती पंपाचा वीज पुरवठा वीज बिलासाठी खंडित करण्याचा आदेश नसताना देखील महावितरणच्या अधिकाऱ्यांनी थकीत वीज बिलासाठी शेतीपंपाचा विद्युत पुरवठा खंडित केला याबाबत शेतकऱ्यांचा रोष लक्षात घेता. शिंदे फडणवीस सरकारने विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला नसल्याचे सांगत शेतकऱ्याच्या भावना शांत करण्याचा प्रयत्न केला.

मात्र ज्या शेतकऱ्यांचे ट्रान्सफॉर्मर जळाला त्या ट्रान्सफॉर्मरवरील वीज बिल भरल्याशिवाय तो ट्रान्सफर बदलून दिला जात नाही. महावितरणच्या निष्काळाची अधिकाऱ्याच्या अधिकाऱ्यामुळे तालुक्यातील भाळवणी येथील माने वस्तीवरील ट्रांसफार्मर 13 फेब्रुवारी रोजी जळाला होता.

15 फेब्रुवारीला ट्रान्सफॉर्मर काढून नेला व या ट्रान्सफॉर्मवरील शेतकऱ्यांनी ठराविक रक्कम गोळा करत 54 हजार रुपये इतकी रक्कम बिलापोटी भरले मात्र आज अखेर त्यांना ट्रान्सफॉर्मर बदलून दिला जात नाही याबाबत शेतकऱ्याकडून विचारणा केली असता केबल नाही.

ट्रान्सफॉर्मरला ऑईल नाही, अशी उडवा उडवीची उत्तर देत अधिकाऱ्यांनी ती जबाबदारी माझी नाही दुसऱ्या खात्याची आहे असे सांगून शेतकऱ्यांना परत पाठवण्याचा प्रताप केला आहे वास्तविक पाहता ज्या शेतकऱ्याचे वीज बिल थकले आहेत

त्याच शेतकऱ्याचा वीजपुरवठा खंडित न करता संपूर्ण ट्रान्सफॉर्मरचा वीज पुरवठा खंडित करण्याचा अधिकार महावितरणच्या अधिकार्‍याला कोणी दिला असा अहवाल याबाबत शेतकरी वर्गातून विचारला जात आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांना कोण वाली आहे का ? अशी चर्चा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही.आ. समाधान आवताडे ने महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासमवेत बैठक घेऊन तालुक्यात वीज दुरुस्तीसाठी आलेल्या निधी व जळालेले ट्रान्सफॉर्मरचा आढावा घेण्याची मागणी या निमित्ताने होत आहे.

माझी दीड एकर द्राक्षाची बाग असून शेतीपंपाचे विज बिल भरले.बंद ट्रान्सफॉर्मर बदलून देण्यासाठी अधिकाऱ्याकडून गेली चार दिवसापासून उडवा उडवीची आणि चालढकलीची उत्तरे दिली. आता तर त्यांनी ती जबाबदारी माझी नाही अशी सांगितल्यामुळे माझ्या द्राक्ष बागेच्या होणाय्रा नुकसानीची जबाबदारी कोणावर सोपवायची ?

- तुकाराम रोंगे शेतकरी भाळवणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com