दोन्ही डोस घेतलेले महापालिका उपायुक्त धनराज पांडे कोरोना पॉझिटिव्ह!

दोन्ही डोस घेतलेले महापालिका उपायुक्त धनराज पांडे कोरोना पॉझिटिव्ह!
covid 19
covid 19Sakal
Summary

कोरोनावरील प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतानाही महापालिकेचे उपायुक्‍त धनराज पांडे हे कोरोना बाधित आले आहेत.

सोलापूर : कोरोनावरील प्रतिबंधित लसीचे (Covid Vaccine) दोन्ही डोस घेतलेले असतानाही महापालिकेचे उपायुक्‍त धनराज पांडे (Dhanraj Pandey) हे कोरोना (Covid-19) बाधित आले आहेत. धक्‍कादायक बाब म्हणजे, रॅपिड अँटिजेन टेस्ट (Rapid Antigen Test) निगेटिव्ह, परंतु आरटीपीसीआर (RTPCR) टेस्ट पॉझिटिव्ह आली. तत्पूर्वी, त्यांना यापूर्वीही कोरोना होऊन गेला होता. दरम्यान, मी स्वत: वारंवार मास्क वापरत असतानाही कोरोना झाला, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Municipal Deputy Commissioner Dhanraj Pandey received a positive corona report)

covid 19
'या' कारणामुळे बजावली शिक्षणाधिकाऱ्यांनी चार शिक्षकांना नोटीस!

नागरिकांनी लस घेतली, आता मला काहीही होत नाही, मास्क वापरतोय मला कोरोना होत नाही, अशा गैरसमजात कोणीही राहू नये. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, हातांची स्वच्छता, गर्दीत जाणे टाळणे, अशा नियमांचे तंतोतंत पालन करायलाच हवे. प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस प्रत्येकाने घ्यावेत, असेही पांडे म्हणाले. तसेच मागील तीन दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. मागील तीन-चार दिवसांपासून त्यांना त्रास जाणवू लागला होता. आता त्यांची प्रकृती ठीक असल्याचे त्यांनी स्वत: स्पष्ट केले आहे.

covid 19
एक कोटी व्यक्‍तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका! जाणून घ्या नेमकं कारण

खासगी रुग्णालयांसाठी 'हे' निर्देश

कोरोना संदर्भातील लक्षणे असलेला संशयित शहरातील कोणत्याही खासगी दवाखान्यात अथवा मेडिकलमध्ये (Medical) गेल्यास त्या व्यक्‍तीला कोरोना टेस्टसाठी जवळील नागरी आरोग्य केंद्रात पाठवावे, असे निर्देश आरोग्याधिकारी डॉ. बसवराज लोहारे (Dr. Basavraj Lohare) यांनी दिले आहेत. शहरातील कोरोनाचे रुग्ण वाढत असून सर्दी, ताप, खोकला असलेला कोरोनासदृश रुग्ण खासगी दवाखान्यात उपचारासाठी आल्यानंतर त्याची सुरवातीला कोरोना टेस्ट करून घ्यावी. संशयित रुग्ण त्या आजारावरील औषधे खरेदीसाठी मेडिकलमध्ये गेल्यास संबंधितांनी त्याच्याकडील कोरोना रिपोर्ट पाहूनच औषधे द्यावीत, असेही डॉ. लोहारे यांनी स्पष्ट केले आहे. महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी दिलेल्या आदेशानुसार खासगी हॉस्पिटल्स (Hospital), मेडिकल चालकांनी कार्यवाही करावी. दररोजच्या रुग्णांची नोंद ठेवावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. आयुक्‍तांच्या नेतृत्वाखाली शहरातील कोणत्याही दवाखान्यातील रजिस्टरची कधीही पडताळणी होऊ शकते. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या डेथ ऑडिटवरूनही कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com