एक कोटी व्यक्‍तींना Covid-19 चा सर्वाधिक धोका! जाणून घ्या नेमकं कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना
एक कोटी व्यक्‍तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका! जाणून घ्या नेमकं कारण

एक कोटी व्यक्‍तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका! जाणून घ्या नेमकं कारण

सोलापूर : राज्यात 16 जानेवारी 2021 पासून कोरोनावरील प्रतिबंधित लसीकरण (Covid Vaccination) सुरू झाले असतानाही राज्यातील एक कोटी आठ लाख 83 हजार व्यक्‍तींनी एकही डोस घेतलेला नाही. ठाणे (Thane), नाशिक (Nashik), जळगाव (Jalgaon), नांदेड (Nanded), नगर (Nagar), सोलापूर (Solapur), बीड (Beed) या जिल्ह्यांतील सर्वाधिक व्यक्‍ती लसीकरणापासून दूर आहेत. लस न घेतलेल्यांनाच कोरोना (Covid-19), ओमिक्रॉनचा (Omicron) सर्वाधिक धोका असून त्यांच्यात विषाणूची तीव्रता अधिक असल्याची चिंता सार्वजनिक आरोग्य विभागाने (Public Health Department) व्यक्‍त केली आहे. (One crore people in the state are most at risk of Corona infection)

हेही वाचा: 'आता कारवाई मागे नाही; आधी कामावर रुजू व्हा, नंतर बोलणी करू'

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच ओमिक्रॉनचा विळखाही घट्ट होत आहे. मुंबई (Mumbai), पुण्यातील (Pune) शाळा बंदचा निर्णय यापूर्वीच झाला असून राज्यात निर्बंधही लागू केले आहेत. तरीही, संसर्ग कमी झाला नसून सध्या बाधित होणाऱ्यांमध्ये लस न टोचलेलेच सर्वाधिक आहेत. त्यांच्यातील विषाणूची तीव्रताही अधिक जाणवू लागली आहे. दोन्ही डोस घेतलेल्यांना केवळ साधा ताप, सर्दी, खोकला असल्याची बाब समोर आली आहे. तरीही, राज्यातील तब्बल एक कोटी व्यक्‍ती पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठी आलेच नाहीत. दुसरीकडे, 15 ते 18 वयोगटातील 60 लाख मुलांना कोवॅक्‍सिन (Covaxin) लस टोचणे अपेक्षित आहे. त्यातील 38 लाख मुलांनी अजूनही लस घेतलेली नाही. दरम्यान, ज्या व्यक्‍तींना लसीचे दोन्ही डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले, त्यांनी त्याच लसीचा बूस्टर डोस (Booster Dose) घ्यावा, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

स्थानिक प्रशासनाच्या हाती शाळा बंदचा निर्णय

राज्यात कोरोनाचे दररोज सरासरी 32 हजारांवर रुग्ण आढळू लागले आहेत. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आता संसर्ग वाढत असल्याने शाळांमधील (School) विद्यार्थ्यांची उपस्थिती घटली आहे. राज्यस्तरावर शाळा बंदचा निर्णय होईल, याची प्रतीक्षा जिल्हा प्रशासनाला आहे. परंतु, स्थानिक परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्‍त शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतात, असे शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांनी स्पष्ट केले.

लसीकरणात पिछाडीवरील जिल्हे

ठाणे, नाशिक, जळगाव, नांदेड, नगर, सोलापूर व बीड या प्रत्येक जिल्ह्यातील सव्वापाच ते दहा लाख लाख व्यक्‍तींनी तर यवतमाळ, बुलढाणा, लातूर, नंदूरबार, अमरावती, पालघर, धुळे, जालना, परभणी व अकोला या जिल्ह्यांमधील तीन ते पावणेपाच लाख व्यक्‍ती लसीकरणापासून दूर आहेत. नागपूर (Nagpur), चंद्रपूर (Chandrapur), गडचिरोली (Gadchiroli), कोल्हापूर (Kolhapur), वाशिम (Washim), हिंगोली (Hingoli) व उस्मानाबाद (Osmanabad) या जिल्ह्यातील जवळपास 15 लाख व्यक्‍तींनी लस घेतलीच नाही. लस न घेतलेल्यांमध्ये विषाणूची (Corona Virus) तीव्रता अधिक असल्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसकर (Dr. Dilip Mhaiskar) यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: PNB ग्राहकांना धक्का! 15 जानेवारीपासून 'या' सेवांसाठी वाढणार शुल्क

राज्यातील नऊ कोटी 14 लाख 35 हजार व्यक्‍तींनी प्रतिबंधित लस टोचणे अपेक्षित आहे. 100 टक्‍के लसीकरणासाठी राज्यात केंद्रे उभारली, तरीही एक कोटींहून अधिक व्यक्‍तींनी अजूनपर्यंत लस घेतली नाही. त्यांना कोरोना, ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका होऊ शकतो.

- डॉ. सचिन देसाई (Dr. Sachin Desai), सहसंचालक, सार्वजनिक आरोग्य, पुणे

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top