
सोलापूर: महापालिकेच्या शहर व्यवस्थापन विभागात सध्या रखवालदार म्हणून काम करणारा अंबादास बापूवट्टे यांनी बनावट कागदपत्रे तयार करून नेहरू नगरातील महापालिकेच्या मालकीची जागा विकली. या जागेच्या व्यवहारासाठी चक्क दारूच्या पार्ट्यांसाठी बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. गणेश पेठ येथील मोहनराव पाटील या गाळेधारकाला भूमापन क्र. ३३/२/१० ब येथील १५० स्क्वेअरफूट जागा रजिस्टर खरेदीखताने विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.