75 वर्षीय वृध्द महिलेवर शारीरीक अत्याचार करून केला खून! शिक्षेची आज सुनावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

75 वर्षीय वृध्द महिलेवर अत्याचार करून केला खून! शिक्षेची आज सुनावणी
75 वर्षीय वृध्द महिलेवर शारीरीक अत्याचार करून केला खून! शिक्षेची आज सुनावणी

75 वर्षीय वृध्द महिलेवर अत्याचार करून केला खून! शिक्षेची आज सुनावणी

सोलापूर : वृध्द पती-पत्नी करजगी (ता. अक्‍कलकोट) येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शाखेतून डूलचे पैसे काढण्यासाठी गेले होते. पतीचे काम लवकर झाल्याने ते निघून गेले आणि 75 वर्षीय वृध्द महिला त्यांचे काम झाल्यावर घरी जायला निघाल्या. त्यावेळी घरी सोडतो म्हणून स्वत:च्या दुचाकीवर बसवून मल्लप्पा बसवंत बनसोडे (वय 48, रा. उडगी, ता. इंडी) याने त्या 75 वर्षीय वृध्द महिलेवर शारीरीक अत्याचार करून त्यांचा खून केला. या गुन्ह्यात आरोपीला न्यायालयाने दोषी धरले असून शिक्षेवरील सुनावणी उद्या (मंगळवारी) जिल्हा व सत्र न्यायाधीश यु. एल. जोशी यांच्या कोर्टात होणार आहे. आरोपीला फाशी की जन्मठेपेची शिक्षा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: युवक कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदी डोंगरे तर जिल्हाध्यक्षपदी सुनंजय पवार

घटनेची हकीकत अशी, डूलची रक्‍कम काढण्यासाठी मयत महिला व तिचा पती हे 19 जानेवारी 2019 रोजी करजगी येथील बॅंकेत गेले होते. त्या महिलेच्या पतीचे काम लवकर आटोपल्याने ते एकटेच घरी परतले. पत्नीला पैसे मिळायला विलंब लागला. पैसे घेऊन बॅंकेतून बाहेर पडल्यानंतर आरोपी मल्लप्पा बनसोडे याने त्या वृध्द महिलेला हटकले. तुम्हाला कुठे जायचे आहे, मी सोडतो म्हणून दुचाकीवर बसविले. वाटेतच गाडी थांबवून त्याने महिलेकडे पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने महिलेला निर्जनस्थळी नेऊन शारीरिक अत्याचार केले. त्यानंतर निघृणपणे खून केला आणि तो पसार झाला. दरम्यान, खूप उशीर होऊनही आई घरी न आल्याने मुलाने त्यांची चौकशी केली. त्यावेळी अक्‍कलकोट स्टेशन ते तोळणूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर कडबगावच्या शिवारात एक महिला मृतावस्थेत पडल्याचे त्यांना समजले. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिल्यानंतर रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेली आई त्यास दिसली. त्यानंतर कडबगावच्या पोलिस पाटील महानंदा माळी व अक्‍कलकोट दक्षिण पोलिस ठाण्याचे पोलिस त्याठिकाणी आले. पोलिस हवालदार महमंद नाईकवाडी यांनी त्याप्रकरणी फिर्याद दिली. सुरवातीला आकस्मात मयत अशी नोंद झाली. घटनास्थळाचा पंचनामा, साक्षीदाराचे जबाब आणि मयताच्या शवविच्छेदन अहवालानुसार वृध्द महिलेवर शारीरिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची बाब समोर आली. आरोपीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. तेवढ्यात एकाने त्या महिलेबरोबर एका पुरुषाला पाहिल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी मल्लप्पा बनसोडेला अटक केली. पोलिस निरीक्षक सी. बी. बेरड यांनी सबळ पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. तपासाअंती त्याच्यावरील आरोप सिध्द झाले आहेत.

हेही वाचा: सोलापूर : महाविकास आघाडीमुळेच रखडली समांतर जलवाहिनी

सरकारी वकिलांचा महत्वपूर्ण युक्‍तीवाद
घटनास्थळाचा पंचनामा, शवविच्छेदनाचा अहवाल, साक्षीदाराचे जबाब आणि मयताचे व आरोपीचे कपडे, त्यावरील रक्‍ताचे डाग, यावरून मल्लप्पा यानेच हे कृत्य केल्याचा युक्‍तीवाद जिल्हा सरकारी वकिल प्रदिपसिंग राजपूत यांनी केला. न्यायालयाने तो युक्‍तीवाद ग्राह्य धरून आरोपीला दोषी धरले. दरम्यान, असे अपराध क्‍वचित प्रकरणात मोडत असल्याने व आरोपीने वृध महिलेवर अतिशय क्रुरतेने शारीरीक अत्याचार करून निघृणपणे खून केला आहे. अमानवी कृत्य करणाऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी ते करणार आहेत. या प्रकरणात आरोपीतर्फे ऍड. ए. डी. कुलकर्णी हे काम पाहत आहेत. कोर्ट पैरवी म्हणून पोलिस शिपाई दिनेश कोळी यांनी काम पाहिले.

Web Title: Murder Of A 75 Year Old Woman By Physical

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top