महापालिकेचे 'माय सोलापूर ऍप'! शहरवासीयांसाठी ऑनलाइन सुविधा | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेचे 'माय सोलापूर ऍप'! शहरवासीयांसाठी ऑनलाइन सुविधा
महापालिकेचे 'माय सोलापूर ऍप'! शहरवासीयांसाठी ऑनलाइन सुविधा

महापालिकेचे 'माय सोलापूर अ‍ॅप'! शहरवासीयांसाठी ऑनलाइन सुविधा

सोलापूर : महापालिकेच्या विविध विभागांतून आवश्‍यक असणाऱ्या परवानग्या, नोंदी, तक्रारी आदींसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधांसाठी महापालिकेच्या संगणक विभागाकडून 'माय सोलापूर अ‍ॅप'चा (My Solapur App) प्रारंभ महापौर श्रीकांचना यन्नम (Shrikanchana Yannam) व आयुक्‍त पी. शिवशंकर (P. Shivshankar) यांच्या हस्ते करण्यात आले. महापौर कक्षात संगणक विभागाच्यावतीने नागरिकांना सेवासंबंधीचे अर्ज ऑनलाइन करण्यासाठीची सुविधा माय सोलापूर अ‍ॅपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मोबाईल अ‍ॅपचा प्रारंभ महापौर श्रीकांचना यन्नम, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

हेही वाचा: कर्नाटकातील तरुणाचे गुप्तांग कापले! तिघे पोलिसांच्या ताब्यात

अ‍ॅपचे वैशिष्ट्य...

कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी गूगल प्ले स्टोअरमधून हे अ‍ॅप डाउनलोड करून घ्यावे लागेल. त्यामध्ये विविध विभाग दिले आहेत. ज्या विभागासंबंधित नागरिकांचे काम त्यासंबंधीच्या विभागावर क्‍लिक करून अर्ज करता येणार आहे. एकूण 28 विभागांपैकी 10 महत्त्वाचे विभाग ऑनलाइन करण्यात आले असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. ऑनलाइन अर्ज कसे भरावे, संबंधित परवान्यांची फी कशी भरावी, याबाबत सर्व माहिती या अ‍ॅपमध्ये देण्यात आली असल्याचेही सहाय्यक आयुक्‍त पवार यांनी यावेळी सांगितले.

नागरिकांना आपल्या धावपळीच्या जीवनात ऑनलाइन अ‍ॅप महत्त्वाचे असणार आहे. छोट्या कामांसाठी नागरिकांची मोठी गर्दी महापालिकेत होत असते. वेळ, पैसा व इतर खर्च वाया न घालविता नागरिकांनी या अ‍ॅपचा वापर करावा.

- श्रीकांचना यन्नम, महापौर

नागरिकांना जलद व योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या अ‍ॅपची निर्मिती केली आहे. काही ठराविक विभागात नागरिकांची वर्दळ अधिक आहे. ती कमी व्हावी, नागरिकांना घरबसल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हे अ‍ॅप आहे. नागरिकांनी या ऑनलाइन सुविधेचा लाभ घ्यावा.

- पी. शिवशंकर, आयुक्‍त

हेही वाचा: सोलापूरच्या विद्या कुलकर्णी यांची CBI च्या संयुक्त संचालकपदी निवड

ऑनलाइनद्वारे मिळणार या सुविधा

  • कर भरणे व ना हरकत प्रमाणपत्र

  • सौरऊर्जा व जलपुनर्भरण प्रकल्प राबविला असल्यास कर आकारणीमध्ये सूट मिळविणे

  • जन्म -मृत्यू दाखले व बाळाच्या नावाची नोंद

  • घरी जन्म अथवा मृत्ये झालेली नोंदणी

  • नर्सिंग होम परवाना

  • विविध व्यवसायांसाठीचा परवाना

  • बांधकाम परवाना

  • हुतात्मा स्मृती मंदिर हॉल बुकिंग

  • तक्रारी अर्ज

  • घरगुती सेफ्टी टॅंक

बातमीदार : प्रमिला चोरगी

loading image
go to top