

“Shaktipeeth Highway project reactivated; Solapur’s key environmental hearing set for December 18.”
Sakal
सोलापूर : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गास मराठवाड्यासह राज्यभर शेतकऱ्यांचा विरोध असतानाही सरकार पर्यावरणीय अहवाल तयार करत आहे. त्यासाठी पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. सोलापूर, हिंगोली, धाराशिव जिल्ह्यांत पर्यावरणीय सुनावणीच्या तारखा निश्चित केल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात १८ डिसेंबरला पर्यावरणीय जनसुनावणी होणार आहे.