Solapur Crime : गुणात वाढ करून देऊ असे सांगून प्रत्येकी ९० लाख रुपये उकळायचे. विशेष सीबीआय न्यायाधीश देसाई यांनी जामीन मंजूर केला. या प्रकरणात अन्य तीन आरोपींना पकडायचे असल्याने दोघांना जमीन देऊ नये, असा युक्तिवाद सीबीआयने केला होता.
सोलापूर : नीट परीक्षेत गुण वाढवून देतो असे सांगून अनेकांची फसवणूक करणाऱ्या संदीप जवाहर शाह आणि सलीम पटेल या दोघांना शनिवारी (२१ जून) मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने जामीन मंजूर केला. याची माहिती सोमवारी उपलब्ध झाली.