

Solapur police investigating a ₹1.10 crore NEET fraud case involving false promises of increasing exam scores.
Sakal
सोलापूर : मुलगा बारावी उत्तीर्ण झाल्यावर तो ‘नीट’ची तयारी करीत होता. त्यातून अरविंद गोविंद चंडक (रा. साई सत्यम रेसिडेन्सी, भवानी पेठ) या संशयित आरोपीने परीक्षेत गुण वाढवून देण्याचे आमिष दाखविले. त्याच्यावर विश्वास ठेवून मेहदीअली इकराम सय्यद (रा. टिळक नगर, मजरेवाडी) यांनी चंडक यास एक कोटी १० लाख रुपये दिले. पण, त्याने ना परीक्षेत गुण वाढविले ना पैसे परत दिले. या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.