सोलापूर : नव्या वर्षात मिळणार नवे कारभारी

महापालिका, झेडपी, सर्व नगरपालिका, विधानपरिषदेची निवडणूक
solapur smc
solapur smcsakal

सोलापूर : सोलापूर महापालिका, सोलापूर जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या ११ तालुका पंचायत समित्या, ११ नगरपरिषदा/नगरपालिका व सहा नगरपंचायतींच्या निवडणुका २०२२ मध्ये होणार आहेत. याशिवाय विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील सोलापूरची निवडणूक, सोलापूर जिल्हा दूध संघ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक या महत्वाच्या संस्थांच्याही निवडणुका नव्या वर्षात होणार असल्याने जिल्ह्याच्या राजकारणाला, स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि महत्वाच्या सहकारी संस्थांना नव्या वर्षात नवे कारभारी मिळणार आहेत. (election 2022)

solapur smc
सोलापूरसह चार जिल्ह्यातील नऊ हजार स्वस्त धान्य दुकाने होणार आयएसओ

सात रस्ता येथील जागेत महसूल भवनाचे काम अंतिम टप्प्यात असून नव्या वर्षात महसूल भवनाचे काम पूर्ण होऊन जिल्हाधिकारी कार्यालयातील काही अधिकारी महसूल भवनातून जिल्ह्याचा कारभार पाहण्याची शक्‍यता आहे. २०२१ च्या शेवटच्या टप्प्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. नव्या वर्षात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा/ओमिक्रॉनचा धोका मात्र कायम असणार आहे.(new year however the danger of the third wave of omicron and corona will remain)

solapur smc
देशात दुसऱ्या क्रमांकाची स्वस्त धान्य दुकाने महाराष्ट्रात

जिल्हा परिषद

  • आरोग्य केंद्रांसाठी जनसंजिवनी अभियान

  • जिल्हा परिषद लोकाभिमुख करण्यासाठी सीईओंचा उपक्रम

  • झेडपीला मिळणार नवीन अध्यक्ष, सभापती

जिल्हाधिकारी कार्यालय

  • जिल्हा नियोजन समितीवर येणार नवे चेहरे

  • सात रस्ता परिसरातील नव्या जागेत स्थलांतरीत होणार कार्यालय

  • लिलाव प्रक्रिया सुरु झाल्याने उपलब्ध होणार वाळू

solapur smc
सोलापूर : बार्शीत अवैध सावकारी विरोधात एकावर गुन्हा दाखल

सिंचन

  • आमदारांच्या पाठपुराव्यातून उजनी धरण गाळमुक्‍तीची आशा

  • २०१० पासून रखडलेला देगाव जलसेतू यंदा पूर्ण होणार

  • कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेबद्दल यंदा होईल महत्वाची बैठक

गुन्हेगारी

  • पोलिस आयुक्‍त हरिष बैजल यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळणार नवे आयुक्‍त

  • रात्रीची गस्त, गुन्हे शाखेचे पथक, डीबी पथक असतानाही गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेलेच; नववर्षात गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान

  • लाचलुचपतच्या कारवाईत पोलिसच प्रथम ही ओळख पुसण्यासाठी प्रयत्नांची गरज

  • ग्रामीण पोलिसांचे ‘ऑपरेशन परिवर्तन’ हा प्रयोग राज्यस्तरावर राबविला जाऊ शकतो

solapur smc
बार्शीत विवाहितेची पेटवून घेऊन आत्महत्या! चौघांविरोधात गुन्हा दाखल

प्राथमिक-माध्यमिक शिक्षण

  • दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑफलाइन परीक्षा

  • प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी होतील विशेष प्रयत्न

  • शिक्षण खात्यात पैसे दिल्याशिवाय काम होत नाही ही ओळख पुसण्याची गरज

विद्यापीठ

  • यंदा होणार विद्यापीठाचे नॅक मूल्यांकन; अव्वल स्थानासाठी प्रयत्न

  • युवा महोत्सव विद्यापीठातच होणार; पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींचे स्मारक उभारण्याचे नियोजन

  • नवीन परीक्षा भवन, प्रशासकीय भवनाचे काम पूर्ण होऊन नव्या ठिकाणाहून चालणार कारभार

वाहतूक

  • सिध्देश्‍वर व उद्यान एक्‍स्प्रेसला एसी-३ टीयर इकॉनॉमी कोच (डबा) असणार

  • नववर्षात एसटी विलिनीकरण, खासगीकरण यापैकी एक निर्णय होण्याची आशा

  • रेल्वे दरोडा रोखण्याचे रेल्वे पोलिसांसमोर मोठे आव्हान; सिग्नलवर ठेवावा लागणार वॉच

  • रस्ते अपघात कमी करण्यासाठी ठोस उपायांची गरज; कागदोपत्री नियोजन नकोच

  • सोलापूर-विजयपूर बायपास नववर्षात सुरु होणार; शहराची जड वाहतुकीतून होईल सुटका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com