
उपळाई बुद्रूक : आयआयटीसारखी देशातील सर्वोच्च आणि अत्यंत स्पर्धात्मक परीक्षा... लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न आणि लाखो रुपये खर्चून घेतले जाणारे कोचिंग... या सर्वांच्या बाहेर जाऊन पडसाळी (ता. माढा) येथील राज लालासाहेब देशमुख याने केवळ स्वतःच्या मेहनतीवर, कोणताही कोचिंग क्लास न करता आयआयटी मुंबईमध्ये प्रवेश मिळवला आहे.