

Medical experts from the American College of Cardiology present new findings setting 120/80 mm Hg as the standard blood pressure level
Sakal
-प्रकाश सनपूरकर
सोलापूर: अमेरिकन कॉर्डिओलॉजी संघटनेने केलेल्या सर्वेक्षणातून आढळून आलेल्या निरीक्षणांनुसार उच्च रक्तदाबाचे आता निकष बदलण्यात आले आहेत. यापूर्वी सिस्टोलिक (वरचा) १४० तर डायस्टोलिक (खालचा) ९० मिमी एचजी रक्तदाब सामान्य मानला जात होता.
मात्र ८० पेक्षा जास्त रक्तदाब असताना अनेकदा हृदयविकार, पक्षाघाताचे रुग्ण आढळल्याने निकष बदलून आता सिस्टोलिक १२० तर डायस्टोलिक ८० म्हणजे १२०/८० मिमी एचजी असा असणार आहे. यामुळे आजारांचे निदान करणे सोपे होणार आहे.