आता घरबसल्या करू शकता पोलिसांत तक्रार! जाणून घ्या प्रक्रिया | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आता घरबसल्या करू शकता पोलिसांत तक्रार! जाणून घ्या प्रक्रिया
आता घरबसल्या करू शकता पोलिसांत तक्रार! जाणून घ्या प्रक्रिया

आता घरबसल्या करू शकता पोलिसांत तक्रार! जाणून घ्या प्रक्रिया

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहर पोलिस आयुक्‍तालयाने (Solapur City Police Commissionerate) नागरिकांच्या सोयीसाठी ड्रीम केअर डेव्हलपर्सच्या माध्यमातून नवे संकेतस्थळ (www.solapurcitypolice.gov.in) विकसित केले आहे. सिटिजन पोर्टलची लिंक या वेबसाईटला जोडल्याने शहरातील नागरिकांना घरबसल्या त्यावरून शहर अथवा राज्यातील कोणत्याही पोलिस ठाण्यात तक्रार देता येणार आहे.

हेही वाचा: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केला डोक्‍यात पाटा घालून पतीचा खून!

पोलिस आयुक्‍तालयाचे नवे संकेतस्थळ मराठी व इंग्रजी भाषेतून तयार करण्यात आले आहे. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने नागरिकांना लॅपटॉप अथवा संगणकाच्या डेस्कटॉपवर काही सेंकदात ते संकेतस्थळ उघडता येईल, असा विश्‍वास पोलिस आयुक्‍त हरीश बैजल यांनी व्यक्‍त केला. पोलिस आयुक्‍त ते सहाय्यक पोलिस आयुक्‍तांसह सर्व पोलिस ठाणी, पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचे मोबाईल क्रमांक, पत्ता, चौकी, बीट मार्शलची देखील माहिती त्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ही वेबसाईट फेसबुक, ट्‌विटरशी जोडली आहे. आपले सरकार पोर्टलची लिंक त्या संकेतस्थळाला जोडल्याने नागरिकांना विविध प्रश्‍नांवर थेट सरकारकडेही तक्रार करता येणार आहे. स्वतंत्र ऍडमिन पॅनेल दिल्याने वेबसाईट दररोज अपडेट असेल, असे पोलिस उपायुक्‍त बापू बांगर यांनी स्पष्ट केले. या संकेतस्थळाचा डेमो सोमवारी (ता. 22) पोलिस आयुक्‍तांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहिला. यावेळी पोलिस उपायुक्‍त बांगर, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे, सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे, उपनिरीक्षक बायस, विवेक मेंगजी आदी उपस्थित होते.

हेही वाचा: मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारताची सुधारणा! जगात आहे 'या' क्रमांकावर

नव्या संकेतस्थळाची ठळक वैशिष्ट्ये...

  • वेबसाईट युझर फ्रेंडली असल्याने सर्वांसाठी वापरण्यास सोपी

  • वाहतूक शाखेशी संबंधित दंड व नियमांची मिळणार माहिती

  • महिला व नागरिकांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी टिप्सही त्या संकेतस्थळावर

  • पोलिस आयुक्‍तालयाचे अधिकार, पोलिस भरतीची माहिती, पोलिस विभागाच्या उपक्रमांची मिळणार माहिती

loading image
go to top