मोहोळ तालुक्यातील चालू ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The sugarcane season

मोहोळ तालुक्यातील चालू ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात

मोहोळ : मोहोळ तालुक्यातील चालू ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, अध्यापही चार कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात दोन लाख मेट्रिक टन ऊस उभा आहे. भीमा, लोकनेते, जकराया,व आष्टी शुगर या चार कारखान्यांनी 21 लाख 16 हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून, 20 लाख 13 हजार पोती साखरेचे उत्पादन केले आहे. या चार साखर कारखान्यांनी सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून साडेआठ कोटी युनिट वीजनिर्मिती केल्याची माहिती कारखाना प्रशासनाकडून मिळाली. दरम्यान चालू वर्षी ज्यादा झालेला पाऊस, कधी नाही एवढे पैसे मागणाऱ्या टोळ्या व कारखान्या कडील कमी असलेली यंत्रणा यामुळे शेतकरी रडकुंडीला आला आहे.

गेल्या चार महिन्यापूर्वी कारखाने सुरू झाले. चालू वर्षी पाऊस काळ चांगला झाल्याने सुरूवातीला उसाचे एकरी वजन वाढले, मात्र उसातील पाणी न हाटल्याने उसाला तुरे आले. त्यामुळे उसाच्या पेऱ्यात पोकळी निर्माण होऊन वजनात पुन्हा मोठी घट झाली. त्यात भरीस भर म्हणून उंदरांनी ही मोठे नुकसान केले आहे. गेल्या महिन्याभरा पासून कडक ऊन पडू लागल्याने ऊस तोडणी टोळ्यांचा दम कमी झाला आहे. पहाटे लवकर उठून जाऊन दुपार पर्यंत ऊस तोडतात व तो भरून देतात, त्यामुळे ऊस वाहतुकीचा वेग कमी झाला आहे.

चालू वर्षी पाऊस जादा झाल्याने उसात निरोपयोगी गवत मोठया वाढले आहे. त्यामुळे ते गवत ऊस तोडणीस अडथळा ठरत आहे. त्यासाठी ऊस जाळून तोडला जात आहे. चालू वर्षी कधी नाही येवढे पैसे टोळ्या मागू लागल्या आहेत. फडात जाण्या अगोदर "अगोदर ठरवा मगच ऊस तोडतो" अशी अडचण शेतकऱ्यांना आणतात. एकरी चार ते पाच हजार रुपयांची मागणी होत आहे, तर प्रत्येक खेपेला ट्रॅक्टर चालकाला दोनशे रुपये एंट्री व जेवण द्यावे लागत आहे. शेवटी कसातरी ऊस गाळपास घालवल्या शिवाय भाग नाही म्हणून शेतकरी नाईलाजाने तयार होतो. शिवाय ट्रॅक्टर फडात फसला तर 700 रुपये ट्रॅक्टर व 1000 हजार रुपये जेसीबी घेतो, त्यामुळे चालू वर्षी "म्हशी पेक्षा रेडकू मोठे" झाले आहे.

मात्र यास सर्व प्रकाराकडे कारखान्याचे चीटबॉय ॲग्रीओव्हरशिअर, शेती अधिकारी सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. चालू गळीत हंगामात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ऊस तोडणी टोळ्या पैसे मागू लागल्या तर थेट संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. ऊस तोडणी मजूर व ऊस उत्पादक शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून प्रत्येक साखर कारखान्याला संपर्क अधिकारी नेमण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र त्याची किती कारखान्यानी अंमलबजावणी केली हे पाहणे गरजेचे आहे. एकूण परिस्थितीचा विचार केला तर ट्रॅक्टर चालक, ऊस तोडणी टोळ्या यांची युती व याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणारे कारखाना प्रशासन यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

कारखाना निहाय ऊस गाळप,साखर व विजनिर्मीती तसेच शिल्लक ऊस पुढील प्रमाणे

 • भीमा साखर कारखाना टाकळी सिकंदर-एकुण ऊस गाळप-4 लाख 58 हजार 675 मेट्रीक टन

 • एकुण साखर उत्पादन- 4 लाख 32 700 पोती

 • शिल्लक ऊस- 30 हजार मेट्रीक टन

 • एकुण विज निर्मीती- 2 कोटी 19 लाख 85 हजार 200 युनिट

  जकराया शुगर वटवटे- ऊस गाळप-4 लाख,50 हजार

 • साखर-3 लाख 88 हजार पोती

 • शिल्लक -20 हजार

 • विज निर्मीती -2 कोटी 88 लाख युनीट

  आष्टी शुगर- ऊस गाळप-4 लाख 67 हजार 255

 • साखर -4 लाख 37 हजार पोती

 • शिल्लक - 40 हजार

 • विज निर्मीती-83 हजार 900 युनीट

  लोकनेते शुगर -एकुण गाळप-7 लाख 40 हजार

 • साखर-7 लाख 55 हजार पोती

 • शिल्लक - 1 लाख टन

 • विज -3 कोटी 40 लाख यूनिट

Web Title: Ongoing Sugarcane Crushing Season Mohol Taluka

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..