Mahesh Patil : सेंद्रिय पद्धतीने लागवड; दुर्मिळ काळ्या उसापासून गूळ उत्पादनाचा प्रयोग

अकोले बु. (ता. माढा) येथील शेतकरी महेश पाटील यांनी सेंद्रिय पद्धतीने दुर्मिळ असलेल्या काळ्या उसाची लागवड करत त्यापासून काळा गूळ तयार केला आहे.
Jaggery Production
Jaggery ProductionSakal

सोलापूर - अकोले बु. (ता. माढा) येथील शेतकरी महेश पाटील यांनी सेंद्रिय पद्धतीने दुर्मिळ असलेल्या काळ्या उसाची लागवड करत त्यापासून काळा गूळ तयार केला आहे. मधासारख्या गोड असलेल्या या काळ्या गुळाला चांगला भाव मिळू लागला आहे.

महेश पाटील यांची स्वतःची शेती आहे. ते स्वतः कृषी पदवीधर आहेत. शेतीची आवड जपत असताना त्यांच्या वडील राजेंद्र पाटील यांच्याकडूनच त्यांना गोपालनाचा वारसा मिळाला. देशी गाईचा त्यांनी सांभाळ करत जीवामृत, गोकृपामृत याचा उपयोग शेतीसाठी करण्यास सुरवात केली. शिवकाळात काळा ऊस असायचा हा संदर्भ त्यांना मिळाला होता. त्यांनी त्याचा शोध सुरू केला. तमिळनाडूत काळा ऊस असल्याचे समजले. नंतर त्यांना बीड येथील शेतकरी ईश्वर शिंदे यांच्याकडे काळा ऊस मिळाला. त्यांनी त्याची सुरवातीला १० गुठ्यांत लागवड केली.

काळ्या उसाचे वैशिष्ट्य म्हणजे तो इतका मऊ असतो की कोणालाही चावण्यास सोपा पडतो. तसेच हा ऊस सूर्याची उष्णता काळ्या रंगामुळे चांगली शोषत असल्याने त्यात जीवनसत्त्व डी देखील मोठ्या प्रमाणात तयार होते. नंतर त्यांनी शेतात गुऱ्हाळ लावून काळा गूळ तयार करण्यास सुरवात केली. पण काळा गूळ विकण्याचा प्रश्न निर्माण झाला.

त्यांनी सोशल मीडियावरून काळ्या गुळाचे आयुर्वेदिक महत्त्व, उपयोग, काविळीवर होणारे उपयोग यासारख्या अनेक मुद्द्यांवर जोरदार प्रचार सुरू केला. तसेच पुणे- सोलापूर हायवेवर गुळाची विक्री सुरू केली. योग्य माहितीच्या प्रचाराने त्याला प्रतिसाद मिळत गेला. मधूर चवीमुळे लोकांच्या पसंतीला उतरला. यातून कोणताही रासायनिक खताचा खर्च न करता महेश पाटील यांना मोठा आर्थिक लाभ झाला. या कामात त्यांचे भाऊ विकीन पाटील, आई मनीषा पाटील या मदत करतात.

ठळक बाबी

- काळ्या उसाचे दुर्मिळ वाण बीडमधून मिळवले

- पाच बाय एक फुटावर लागवड

- शेतातच गुऱ्हाळ लावून सेंद्रिय गुळाची निर्मिती

- एकूण २४ कामगारांना रोजगार

- गूळ, क्यूब, पावडर व काकवीची निर्मिती

- साध्या गुळापेक्षा जादा भाव

- शेतात ५ देशी गाईंचा सांभाळ

काळ्या गुळाची चव व मधुरता यामुळे त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तसेच चांगला भाव मिळाल्याने इतर गुळाच्या तुलनेत निश्चित जास्त फायदा होतो. त्यामुळे काळ्या उसाची लागवड देखील वाढवली आहे.

- महेश पाटील, अकोले बु. ता. माढा, जि. सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com