विठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत कोविड केअर सेंटरला ऑक्‍सिजन मशिन सुपुर्द 

oxygen machine.jpg
oxygen machine.jpg
Updated on

माढा(सोलापूर): तालुक्‍यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व आमदार बबनराव शिंदे यांच्या पुढाकारातून माढयातील तुळजाभवानी मंगल कार्यालय, कुर्डूवाडीतील श्रीराम व संकेत मंगल कार्यालयातील असणाऱ्या कोव्हिड केअर सेंटरला प्रत्येकी एक याप्रमाणे तीन ऑक्‍सिजन मशिन उपलब्ध करून देण्यात आल्या.

कारखान्याचे संचालक व जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते गटविकासाधिकारी डॉ.संताजी पाटील यांच्याकडे सोमवारी (ता. 14) सुपुर्द केल्या. 

यावेळी जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी सांगितले की, माढा तालुक्‍यात तीन कोव्हिड केअर सेंटर सुरू असून ऑक्‍सिजनअभावी एकही रुग्ण दगावू नये म्हणून कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल रुग्णांपैकी ज्या रुग्णांना श्वास घेण्यास अडचणी येत आहेत. त्यांना या मशिनच्या सहाय्याने ऑक्‍सिजन पुरविला जाणार आहे. या मशीनमुळे रुग्णांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार असून हवेतील ऑक्‍सिजन घेऊन तो रुग्णांना पुरवठा करता येतो. 

त्यामुळे वेगळ्या ऑक्‍सिजन सिलेंडरची गरज पडत नसल्याचेही त्यांनी सांगितले. गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील म्हणाले की, सध्या तीन कोविड केअर सेंटरमध्ये सुमारे तीनशे कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. ऑक्‍सिजन मशीनमुळे उपचार करताना मोठी मदत होणार आहे. याप्रसंगी प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसीलदार राजेश चव्हाण, डॉ. विद्यादेवी तोडेकर, डॉ. शुभम खाडे, डॉ. सागर पाटील, महेश जाधव यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  

 
संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com