Corona : पंढरपुरमध्ये ऐवढ्या रक्कमेच्या उलाढालीवर परिणाम 

Pandharpur Market closed due to corona
Pandharpur Market closed due to corona

पंढरपूर (सोलापूर) : भारताची दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या पंढरपुरातील विठुरायाचे मंदिर भाविकांसाठी मंगळवारपासून बंद केले आहे. त्यामुळे भाविकांनी पंढरीकडे पाठ फिरवली आहे. याचा परिणाम विठ्ठल मंदिर परिसरातील बाजार पेठेवर झाला असून बाजरापेठ ठप्प झाली आहे. येथील सुमारे दररोजच्या एक कोटीहून अधिक रुपयांच्या उलाढालीवर परिणाम झाला आहे. मंदिर बंद असल्याने मंदिर परिसरात सध्या शुकशूकाट दिसून येत आहे. मंदिर परिसरातील शेकडो लहान मोठ्या व्यवसायिकांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. 
देशात आणि राज्यात कोरोना व्हायारसचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. कोरोनाचा प्रतिबंध व्हावा यासाठी देशभरातील अनेक धार्मिक स्थळे आणि मंदिरे काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 
परिणामी महाराष्ट्रातील प्रसिध्द विठुरायाचे मंदिर ही मंगळवारपासून 31 मार्चपर्यंत भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. मंदिर बंद झाल्यामुळे सुमारे 40 ते 50 हजार हून अधिक भाविकांची संख्या कमी झाली आहे. भाविकांनी पंढरीकडे पाठ फिरवल्याने विठ्ठल मंदिर परिसरातील पेढे, फोटो, आगरबत्ती, फुले हार, तुळशीच्या माळा, भजनी साहित्य, हळदीकुंकू,बुक्का, चिरमुरे, बत्तासे, धार्मिक ग्रंथ व पुस्तक विक्री कऱणार्या व्यवसायिकांना याचा मोठा फटका बसला आहे. या शिवाय शहरातील छोटे मोठे हॉटेल, लॉज मालकांनाही याचा आर्थिक फटका बसला आहे. 
विठ्ठल दर्शनासाठी देशासह विविध राज्यातून हजारो भाविक पंढरीत येतात. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने भाविकांना पंढरीत न येणार्या आवाहन केले आहे. त्यामुळे खासगी बस, रेल्वे, रिक्षा, एसटी महामंडळाला देखील याचा तोटा सहन करावा लागणार आहे. मंदिर बंद असल्यामुळे मंदिर समितीच्या उत्पन्नावर देखील याचा मोठा परिणाम होणार आहे. एकूणच विठ्ठल मंदिर बंद झाल्यामुळे पंढरीचे अर्थकारण देखील डळमळीत झाले आहे. 

दररोज पाच लाखाचे उत्पन्न 
विठ्ठल दर्शनासाठी दररोज राज्यासह विविध भागातून सुमारे 30 ते 40 हजार भाविक येतात. विठ्ठल मंदिर समितीला दररोजचे सुमारे पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळते, याच बरोबरच मंदिर परिसरातील बाजार पेठेत देखील मोठी उलाढाल होते. साधारण पंढरपुरातील एक कोटी पेक्षा अधिक रुपयांची उलाढाल होते. कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना कऱण्यासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे स्थानिक बाजार पेठेवर याचा मोठा परिणाम झाला आहे. 
- बालाजी पुदलवाड, व्यवस्थापक, विठ्ठल मंदिर समिती, पंढरपूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com