पेपरविक्रेत्याला कॅन्सर! मात्र चिमुकल्यांसाठी जगण्याची जिद्द

पेपरविक्रेत्याला कॅन्सर! मात्र चिमुकल्यांसाठी जगण्याची जिद्द
पेपरविक्रेत्याला कॅन्सर! मात्र चिमुकल्यांसाठी जगण्याची जिद्द
पेपरविक्रेत्याला कॅन्सर! मात्र चिमुकल्यांसाठी जगण्याची जिद्द
Summary

काही दिवसांपूर्वी कंबर दुखू लागल्याने त्याने खासगी हॉस्पिटलमध्ये चेकअप केले. त्यावेळी त्याला ब्लड कॅन्सर झाल्याचे डॉक्‍टरांकडून समजले.

सोलापूर : माध्यमिक शिक्षण घेत असतानाच वडिलांनी नीलेशची साथ सोडली आणि जगाचा निरोप घेतला. शिक्षण घेण्याच्या वयातच त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली. उदरनिर्वाहासाठी नीलेश सुर्वे (Nilesh Surve) (रा. राघवेंद्र नगर, सैफूल) याने भीमाशंकर ढमामी या वृत्तपत्र विक्रेत्याकडे पेपर विक्रीचे काम करायला सुरवात केली. काही दिवसांपूर्वी कंबर दुखू लागल्याने त्याने खासगी हॉस्पिटलमध्ये (Hospital) चेकअप केले. त्यावेळी त्याला ब्लड कॅन्सर (Blood Cancer) झाल्याचे डॉक्‍टरांकडून समजले. विवाहानंतर आई, पत्नी आणि दोन चिमुकल्यांसोबत त्याच्या सुखाच्या संसाराला नियतीची नजर लागली. त्याला आता मदतीची अपेक्षा आहे.

पेपरविक्रेत्याला कॅन्सर! मात्र चिमुकल्यांसाठी जगण्याची जिद्द
सावधान ! आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत सोलापूर शहरात जमावबंदी

नीलेश हा वाचकांना पहाटे-पहाटे पेपर वाचायला मिळावा म्हणून घरोघरी पेपर टाकण्याचे काम करतो. वडिलांच्या मृत्यूनंतर आईला घरकाम करणे मुश्‍कील होऊ लागल्याने त्याचा विवाह झाला. दोन चिमुकल्यांसोबत त्याचा संसार सुखाने सुरू होता. चार महिन्यांपूर्वी नीलेशच्या कंबरेत खूप दुखू लागले. कामाच्या ताणतणावामुळे दुखत असल्याचे त्याला वाटले. परंतु, ते दुखणे कमी होत नसल्याने त्याने दवाखाना गाठला. त्यावेळी त्याची ब्लड टेस्ट करण्यात आली. त्यानंतर रिपोर्टमध्ये काही गंभीर नसेल, असा विश्‍वास सर्वांनाच होता. मात्र, त्याला रक्‍ताचा कर्करोग असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. त्यानंतर खचलेल्या नीलेशला त्याच्या पत्नीने आधार दिला आणि दोन चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून नीलेशने जगण्याची जिद्द बळकट केली. परंतु, उपचारासाठी वर्षाकाठी 55 ते 60 हजार रुपये लागतील, सातत्याने तपासणी करावीच लागेल, असे डॉक्‍टरांनी त्याला सांगितले. त्यामुळे एवढा मोठा खर्च भागविणे कठीण असल्याने तो सध्या चिंतेत आहे.

पेपरविक्रेत्याला कॅन्सर! मात्र चिमुकल्यांसाठी जगण्याची जिद्द
विधानपरिषद निवडणुकीचा अंदाज येईना अन्‌ रणनीतीही ठरेना!

उपचारासाठी 'इथे' करावी मदत

वडिलांचे निधन झाल्यानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी नीलेश सुर्वे या तरुणाच्या खांद्यावर आली. त्याचा दवाखान्याचा खर्च, मुलांचे शिक्षण आणि उदरनिर्वाह भागविणे त्याला कठीण झाले आहे. त्याला मदतीची अपेक्षा असून समाजातील विविध घटकातील दानशूर व्यक्‍तींच्या मदतीने त्याच्यासमोरील अडचणींचा डोंगर त्याला सहजपणे पार करणे शक्‍य होणार आहे. बॅंक ऑफ इंडियाच्या 070818210008817 या बॅंक खात्यावर (आयएफसी कोड: BKID0000708) मदत करावी, अशी अपेक्षा नीलेशने व्यक्‍त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com