gol ringan.jpg
gol ringan.jpg

पुरंदावडेच्या गोल रिंगण सोहळ्याच्या आठवणी मनी दाटल्या.....

Published on

नातेपुते(सोलापूर)ः जीव शिवांचा हा खेळ, लक्ष-लक्ष डोळ्यांनी आज पाहिले रिंगण...या शब्दात वर्णन करावे अशा भक्तीपूर्ण वातावरणात दरवर्षी पुरंदावडे(ता. माळशिरस) येथे माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण संपन्न होत असते. मात्र, या वर्षी गोल रिंगणाच्या या आनंदाला महाराष्ट्रातील वारकरी व भाविक लोक मुकले आहेत. 

माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पुरंदावडे येथील गोल रिंगण सर्वात मोठे व शिस्तीचे म्हणून प्रसिद्ध आहे. हे रिंगण पाहण्यासाठी देशभरातील विविध अभ्यासक दरवर्षी मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात. परिसरातील लोक हजारो वारकऱ्यांना अन्नदान करतात. त्यामुळे सदाशिवनगर व पंचक्रोशीची ही एक मोठी यात्रा असते. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा वारी रद्द झाल्यामुळे या सर्व आनंदाला मुकावे लागले आहे. 

मधोमध पालखी, भोवती पताका, गोलाकार दिंड्या असे आखीव-रेखीव रिंगण चोपदार लावतात. ध्वजधारक एक फेरी मारतात त्यानंतर स्वाराचा व माऊलींचा अश्व फेरी मारतो. त्यावेळी माऊली माऊली चा जयघोष टिपेला पोहोचलेला असतो. त्यावेळी दिंड्यांमध्ये विविध संत खेळ सुरू असतात. रिंगणानंतर दिंड्यांना चोपदार उडीचे निमंत्रण देतात. सर्व टाळकरी माऊलींच्या पालखी भोवती जमतात, बाहेरच्या बाजूला पखवाजवादक, विणेकरी, तुळशीवाल्या महिला उभ्या असतात. हजारो टाळ एका ठेक्‍यात वाजत असतात, तो नादब्रह्म ऐकून अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com