esakal | यंदाही मिरवणुका नाहीच! शासन आदेशानंतरच स्टॉल, मंडप उभारणीला परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

Lord Ganesh

गणेशोत्सव परवानगीबाबत कोणतेही शासन आदेश अद्याप मिळाले नाहीत, त्यामुळे तूर्तास तरी कोणतीही परवानगी देण्यात येणार नाही.

यंदाही मिरवणुका नाहीच! शासन आदेशानंतरच मंडप उभारणीला परवानगी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : श्री गणेश उत्सव (Ganesh Festival) शांततेत साजरी करण्यासाठी महापालिका (Solapur Municipal Corporation) व पोलिस प्रशासनाकडून (Police administration) गणपती विक्रीसाठी स्टॉल मांडणी व मंडप उभारणीला परवानगी द्यावी, मूर्ती विक्रीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाकडून करण्यात आली. मात्र गणेशोत्सव परवानगीबाबत कोणतेही शासन आदेश अद्याप मिळाले नाहीत, त्यामुळे तूर्तास तरी कोणतीही परवानगी देण्यात येणार नसल्याचे स्पष्टीकरण पोलिस व महापालिका प्रशासनाकडून बैठकीत देण्यात आले.

हेही वाचा: आता बोलबाला पर्यावरणपूरक 'गोमय गणेश मूर्ती'चा !

महापालिकेच्या सावित्रीबाई फुले सभागृह येथे महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सव संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी सभागृह नेते शिवानंद पाटील, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, आयुक्त पी. शिवशंकर, नगरसेवक चेतन नरोटे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, नगरसेवक रियाज खरादी, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, पोलिस उपायुक्त वैशाली कडूकर, महापालिका उपायुक्त एन. के. पाटील, उपायुक्त धनराज पांडे, सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत, सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार, नरसिंग मेंगजी, दिलीप कोल्हे, दास शेळके आदी उपस्थित होते.

हेही वाचा: राज्यात 'या' दिवसापासून सुरू होईल कोरोनाची तिसरी लाट !

या वेळी उत्सव मंडळांनी गणपती मिरवणुकीला नाही तर किमान मंडप मारून उत्सव साजरा करणयासाठी परवानगी द्यावी; तसेच मूर्ती विक्रीसाठी होम मैदानाची जागा मिळावी, अशी मागणी केली. तसेच दरवर्षी मूर्ती संकलन व विसर्जन आदी ठिकाणांबाबत महापालिका नियोजन करते. या नियोजनानुसार पोलिस प्रशासनाकडून शहरात बंदोबस्त तैनात करण्यात येते. त्यामुळे यंदाच्या महापालिकेच्या नियोजनाबाबत विचारणा या बैठकीत झाली. मात्र उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाचे कोणतेच आदेश अद्याप प्राप्त झाले नाहीत, असे आयुक्‍तांनी बैठकीत सांगितले. कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठीच्या उपाययोजना करून, नियमांचे पालन करून गणेशोत्सव घरोघरीच साजरा करावा, असे आवाहनही पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले. बैठकीला पोलिस निरीक्षक, महापालिकेचे सर्व झोन अधिकारी तसेच सर्व गणेशोत्सव महामंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

loading image
go to top