Crime News: लुडो खेळता खेळता झाली मैत्री, प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं अन् अश्लील व्हिडिओ केला व्हायरल

लुडो गेमवर मैत्री करून खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढली मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून गैरवर्तन केले
Crime News
Crime NewsEsakal

लुडो गेमवर मैत्री करून खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढली. तिच्याशी जवळीक साधून मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून गैरवर्तन केले. तसेच अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करून तिची जाणीवपूर्वक बदनामी केल्याप्रकरणी आरोपी अमनदीप करम सिंग (वय २३, रा, लखना थापा, ता. पटटी, जि. तरन तारण, राज्य पंजाब) यास सांगोला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती के. बी. सोनवणे यांनी तीन वर्षे सश्रम कारावास व २५ हजार हजार रुपये दंडाची व दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने साधी कारावास तसेच फिर्यादीस दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा ठोठावली आहे.(Latest Marathi News)

आरोपी अमनदीप हा फिर्यादीशी लुडो गेमवर हेतुपूर्वक मैत्री करून खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. फिर्यादीशी जवळीक साधण्यासाठी वारंवार मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून अश्लील चाळे व गैरवर्तन केले. (Marathi Tajya Batmya)

अश्लील व्हिडिओ तयार करून ते इन्स्टाग्राम, टेलिग्राम, रोपतो व कॉलेजच्या गूगल मॅपवर अपलोड करून फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न करणारे गैरकृत्य करत तिची जाणीवपूर्वक बदनामी केल्याप्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक सुहास जगताप व पोलिस नाईक ए. एस. मोहोळकर यांनी पूर्ण करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

Crime News
Accident News: बीआरटी मार्गावर ऑईलचा टँकर पलटी झाल्याने ट्रॅफिक जाम, अग्निशमन दल दाखल पण..

सरकार पक्षातर्फे ॲड. एस. आर. महाडिक यांनी, सध्या समाजामध्ये शालेय अगर कॉलेज युवतींचा गैरफायदा घेत सामाजिक व मानसिक हानी पोचवून त्यांचे सामाजिक, कौटुंबिक आयुष्य कशा प्रकारे उद्‌ध्वस्त केले जाते याविषयी युक्तिवाद केला. तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यामधील तरतुदींच्या अनुषंगाने आरोपीचे वर्तन हे कायदेशीररीत्या कशा प्रकारे चुकीचे व बेकायदेशीर आहे हे सिद्ध केले. (Marathi Tajya Batmya)

हा युक्तिवाद ग्राह्य धरून सांगोला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती सोनवणे यांनी आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास, तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ मध्ये तीन वर्षे अशी शिक्षा व २५ हजार रुपये दंड व दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने साधी कारावास अशी शिक्षा सुनावली. (Latest Marathi News)

Crime News
Conversion Case: मुंब्रा येथील धर्मांतरासंदर्भात मोठी अपडेट; पोलिस म्हणाले....

तसेच फिर्यादीस दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. महाडिक, व्ही. जी. साळुंखे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून हवालदार पिसे व शिपाई शिंदे यांनी काम पाहिले.(Marathi Tajya Batmya)

Crime News
Maharashtra Politics : ठिणगी पडणार? राज्यात CM शिंदे हे फडणवीसांपेक्षा जास्त फेमस! शिवसेनेच्या जाहिरातीने खळबळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com