esakal | रतनचंद शहा बॅंक अपहार प्रकरणी शाखाधिकाऱ्याच्या पत्नीसह लिपिकाला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

रतनचंद शहा बॅंक अपहार प्रकरणी शाखाधिकाऱ्याच्या पत्नीसह लिपिकाला अटक

शुक्रवारी दोन्ही आरोपींना माढा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.

रतनचंद शहा बॅंक अपहार प्रकरणी शाखाधिकाऱ्याच्या पत्नीसह लिपिकाला अटक

sakal_logo
By
संतोष पाटील

टेंभुर्णी (सोलापूर) : रतनचंद शहा सहकारी बॅंकेच्या (Ratanchand Shaha Sahakari Bank) टेंभुर्णी (Tembhurni) शाखेतील पाच कोटी 57 लाख 2 हजार 822 रुपयांच्या अपहार (Fraud) प्रकरणातील संशयित आरोपी तत्कालीन शाखाधिकारी हरिदास राजगुरू (Haridas Rajguru) याची पत्नी प्रतिभा राजगुरू (Pratibha Rajguru) (वय 39, रा. रोहिदास गल्ली, मंगळवेढा, हल्ली रा. सांगोला) व लिपिक राहुल वाकडे (Rahul Wakde) (वय 38, रा. खंडोबा मंदिराजवळ, मंगळवेढा) यांना सोलापूर (ग्रामीण) च्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस (Police) उपअधीक्षक एस. जी. बोटे (S. G. Bote) यांनी गुरुवारी सायंकाळी अटक केली. शुक्रवारी दोन्ही आरोपींना माढा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.

हेही वाचा: राज्यात 'या' दिवसापासून सुरू होईल कोरोनाची तिसरी लाट !

रतनचंद शहा सहकारी बॅंकेचे सरव्यवस्थापक अरविंद हिरालाल नाझरकर यांनी टेंभुर्णी येथील शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी हरिदास निवृत्ती राजगुरू व तत्कालीन कॅशिअर अशोक भास्कर माळी या दोघांनी संगनमताने एकूण 5 कोटी 57 लाख दोन हजार 822 रुपयांचा अपहार केला असल्याची फिर्याद टेंभुर्णी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी, रतनचंद शहा सहकारी बॅंकेच्या टेंभुर्णी येथील शाखेत हरिदास निवृत्ती राजगुरू हे 11नोव्हेंबर 2014 पासून शाखाधिकारी तर कॅशिअर म्हणून अशोक भास्कर माळी हे कार्यरत होते. या बॅंकेने धनराज नोगजा अँड असोसिएटस्‌ सोलापूर यांच्याकडे लेखापरीक्षणाचे काम दिले होते. त्यांनी केलेल्या लेखा परीक्षणामध्ये आर्थिक व्यवहारामध्ये विसंगती झाल्याचे निदर्शनास आले. यासंबंधीचा लेखापरीक्षण अहवाल बॅंकेकडे सादर केला. रतनचंद शहा सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाने लेखापरीक्षण अहवालावर बैठकीत विचारविनिमय करून दयासागर सिद्धेश्वर देशमाने यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. धनराज नोगजा ऍन्ड असोसिएट्‌सचा लेखापरीक्षण अहवाल व दयासागर देशमाने यांनी केलेल्या केलेल्या चौकशीमध्ये रतनचंद शहा सहकारी बॅंकेच्या टेंभुर्णी शाखेमध्ये हातावरील शिल्लक रक्कम, बॅंक ऑफ इंडिया शाखा टेंभुर्णी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक शाखा टेंभुर्णी या बॅंकांमधील एकूण रक्कम 5 कोटी 57 लाख 2 हजार 822 रुपयांची तफावत आढळून आली. त्यामुळे बॅंकेचे टेंभुर्णी येथील शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी हरिदास राजगुरू व तत्कालीन कॅशिअर अशोक माळी या दोघांनी संगनमताने या रकमेचा अपहार केल्याची फिर्याद बॅंकेचे सरव्यवस्थापक अरविंद हिरालाल नाझरकर यांनी दिली आहे.

हेही वाचा: भालके यांनी द्यावा 'विठ्ठल'च्या अध्यक्षपदाचा राजीनामा : युवराज पाटील

या गुन्ह्याचा तपास सोलापूर (ग्रामीण) आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. यापूर्वीच संशयित आरोपी हरिदास राजगुरू याला अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक एस. जी. बोटे यांनी गुरुवारी प्रतिभा राजगुरू यांच्यासह लिपिक राहुल वाकडे यांना अटक केली असून, शुक्रवारी माढा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले जाणार आहे.

loading image
go to top