
Solapur Fraud
sakal
सोलापूर : ‘महिंद्रा फायनान्सचे लिलाव अधिकारी म्हणून आम्ही काम पाहातो’ असे सांगून इंदूरच्या दोन तरुणांनी समोरील व्यक्तींचा विश्वास संपादन केला. फायनान्सने ओढून आणलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या गाड्यांचे फोटो दाखवून त्या स्वस्तात मिळतील, असे आमिष त्या तोतया लिलाव अधिकाऱ्यांनी दाखविले. त्यातून दोघांनी सातजणांना तब्बल ३० लाख ३९ हजार ९९९ रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.