esakal | लग्नाची वरात पोलिस स्टेशनच्या दारात !
sakal

बोलून बातमी शोधा

Wedding

ऐनवेळी पोलिसांनी नवरा-नवरीला पोलीस स्टेशनमध्ये बंद केल्याने लग्नाची वरात पोलीस स्टेशनच्या दारात अशी अवस्था झाली आहे.

लग्नाची वरात पोलिस स्टेशनच्या दारात !

sakal_logo
By
उमेश महाजन

महूद (सोलापूर) : मोजक्या वर्‍हाडी मंडळीच्या उपस्थित केवळ दोन तासांमध्ये विवाह सोहळा पार पाडावा असे आदेश असतानाही सांगोला तालुक्यातील चिकमहूद अंतर्गत असलेल्या बंडगरवाडी येथे आज शनिवारी शेकडो लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा सुरू होता.सांगोला पोलिसांनी वेळीच यामध्ये हस्तक्षेप करून नवरा-नवरी सह वधू-वरा कडील मंडळीवर गुन्हा दाखल केला आहे. ऐनवेळी पोलिसांनी नवरा-नवरीला पोलीस स्टेशनमध्ये बंद केल्याने लग्नाची वरात पोलीस स्टेशनच्या दारात अशी अवस्था झाली आहे.

हेही वाचा: प्रणितींना पालकमंत्री करण्याची मागणी ! भरणे म्हणाले ...तर मंत्री व आमदारकीचा राजीनामा देईन

देशात सर्वत्र कोरोनाने आहा:कार माजवला आहे.यामुळे मानव जातच संकटात सापडली आहे.अशातही शासनाने गर्दी टाळून मोजक्या वऱ्हाडी मंडळीच्या उपस्थितीमध्ये लग्न सोहळा पार पाडण्यासाठी परवानगी दिली आहे.मात्र नियम मोडण्याची सवय झालेले नागरिक नियम पाळण्यास तयार नाहीत. सांगोला तालुक्यातील चिकमहूद अंतर्गत असलेल्या बंडगरवाडी येथे आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास लग्नकार्य सुरू असून या लग्नासाठी शेकडो वऱ्हाडी उपस्थित आहेत,अशी गुप्त माहिती सांगोला पोलिसांना मिळाली.पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी बंडगरवाडी गाठली.

हेही वाचा: दुचाकी घसरून आईचा मृत्यू; पोटच्या मुलाविरूध्द गुन्हा

शासनाने घालून दिलेल्या नियमापेक्षा अधिक लोक त्या ठिकाणी उपस्थित असल्याने पोलिसांनी नवरा-नवरी सह दोन्ही कडील जवळच्या नातलगांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे. यामध्ये चिकमहूद येथील नवरदेव असणारा राहुल शामराव बंडगर, त्याचे वडील शामराव सिदा बंडगर, नवरदेवाची आई सुनिता शामराव बंडगर,कटफळ(ता.सांगोला)येथील नवरी मुलगी सोनाली अर्जुन अनुसे, नवरी चे वडील अर्जुन तातोबा अनुसे,नवरीची आई उषा अर्जुन अनुसे यांचेसह धनाजी महादेव नारनवर(महिम ता.सांगोला), बाळासाहेब मच्छिंद्र बंडगर,बापू सिदा बंडगर,अण्णासाहेब रामचंद्र तांबवे(तिघेही, चिकमहूद ता.सांगोला) यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

हेही वाचा: क्या बात ! सांगोल्यातील २३ गावांत अद्याप कोरोनाचा शिरकाव नाही

कोरोनाचे मोठे संकट आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे. शासनाने घालून दिलेल्या नियमानुसारच लग्न कार्य करावे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या गाड्या जप्त करण्याची कारवाई सुरू आहे.कोणीही दुकाने उघडू नये. विनाकारण बाहेर फिरू नये. शिवाय जिल्हा बंदी लागू असल्याने जिल्हा सरहद्दीवर नाकाबंदी लावण्यात आलेली आहे.बेफिकीर नागरिकांमुळे इतरांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे.त्यामुळे अशा नागरिकावर कडक कारवाई केली जाईल.- भगवान निंबाळकर, पोलीस निरीक्षक सांगोला

loading image