क्या बात ! सांगोल्यातील २३ गावांत अद्याप कोरोनाचा शिरकाव नाही

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तालुक्यातील या 23 गावांचे अभिनंदन करुन या गावांचा आदर्श संपूर्ण राज्याने घ्यावा असेही आवाहन केले.
Corona
CoronaEsakal
Updated on
Summary

सांगोला येथील आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी जाणून घेऊन तालुक्यातील या 23 गावांचे अभिनंदन केले. अशा गावांचा आदर्श संपूर्ण राज्यांनी घ्यावा असे आवाहनही पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

सांगोला (सोलापूर) : संपूर्ण देशात कोरोनाचा हाहाकार सुरू असतानाच सांगोला तालुक्यातील 23 गावांनी कोरोनाचा विषाणू आपल्या सीमेवरच आडवीला आहे. या 23 गावांत अद्याप कोरोनाचा एकही कोरोना रुग्ण आढाळला नाही. सांगोल्यात कोरोना आढावा बैठक घेतल्यानंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तालुक्यातील या 23 गावांचे अभिनंदन करुन या गावांचा आदर्श संपूर्ण राज्याने घ्यावा असेही आवाहन केले.

Corona
ऑक्‍सिजन निर्मितीबाबत साखर कारखाने सकारात्मक : पालकमंत्री भरणे

कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगच हतबल झाले आहे. सोलापूर जिल्ह्यासह सांगोला तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. रुग्णांना सध्या बेड मिळणेही मुश्कील झाले आहे तर काहींना बेड मिळाल्यानंतर पुढील उपचारासाठी ऑक्‍सिजन व रेमडेसिव्हिर इंजेक्शनही प्रशासन पुरविण्यास असमर्थ झाले आहे. त्यामुळे अनेकांना उपचाराअभावी आपले जीव गमवावा लागत आहे. अशा परिस्थितीतही कोरोना महामारीच्या काळात सांगोला तालुक्यातील 103 गावांपैकी 23 गावांमध्ये अद्याप एकही रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे अशा गावांमधून कोरोना रुग्ण होऊ नये यासाठी कोणते प्रयत्न केले, याबाबत सांगोला येथील आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी जाणून घेऊन तालुक्यातील या 23 गावांचे अभिनंदन केले. अशा गावांचा आदर्श संपूर्ण राज्यांनी घ्यावा असे आवाहनही पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

Corona
बार्शीकरांनो, कोरोनाची साखळी तोडा : पालकमंत्री भरणे

कोरोना रुग्ण नसलेली गावे

सातारकरवाडी, जाधववाडी, बंडगरवाडी, करांडेवाडी, डिकसळ, नराळे, हबीसेवाडी, हनुमंतगाव, गळवेवाडी, खारवटवाडी, शिवणे, मेटकरवाडी, तिप्पेहळी, हटकर मंगेवाडी, गुणापवाडी, मिसाळवाडी, झापाचीवाडी, कोंबडवाडी, काळूबाळूवाडी, करांडेवाडी, सरगरवाडी, बंडगरवाडी, नलवडेवस्ती.

Corona
उजनीचा पाणीसाठा आला 20 टक्‍क्‍यांवर

तालुक्यातील या 23 गावचे नागरिक खरोखरच आदर्शवत आहेत. त्यांनी या महामारीच्या काळातही कोरोना आपल्या गावापासून दूर ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न अभिनंदनीय आहेत. अशा गावांचा आदर्श संपूर्ण राज्यांनी घेऊन सर्वांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी एकत्रीत प्रयत्न केले पाहिजेत.

- दत्तात्रय भरणे, पालकमंत्री.

ही गावे लहान असली तरीसुद्धा येथील नागरिकांनी आपल्या गावात शिरकाव होऊ नये, यासाठी मोठी काळजी घेतली आहे. तिथे काम करणारे अधिकारी, कर्मचारी, नागरिक हे कौतुकास्पद कार्य करीत असून सध्याच्या कोरोना संकटकाळात नागरिकांनी न भिता स्वतःची काळजी घ्यावी. स्वतःची काळजी घेतली तर कुटुंबाची व गावाची काळजी घेतल्यासारखी आहे.

- संतोष राऊत, गटविकास अधिकारी, सांगोला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com