esakal | Solapur: शासनाची तिजोरी रिकामी; रात्रंदिवस राबणारे कर्मचारी चिंतेत
sakal

बोलून बातमी शोधा

police

अस्थायी असलेल्या सोलापूर शहर आयुक्‍तालयातील एक हजार १७७ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मागील महिन्याचा पगार अजूनपर्यंत मिळालेला नाही.

शासनाची तिजोरी रिकामी; रात्रंदिवस राबणारे कर्मचारी चिंतेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पोलिस भरती झाल्यानंतर बंदोबस्ताच्या निमित्ताने अधिक प्रमाणात असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध ठिकाणी ड्युटी करावी लागते. काहींना ठराविक वर्षांनंतर स्थायी स्वरूपात भरती करून घेतले जाते. दरम्यान, अस्थायी असलेल्या सोलापूर शहर आयुक्‍तालयातील एक हजार १७७ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मागील महिन्याचा पगार अजूनपर्यंत मिळालेला नाही.

हेही वाचा: सोलापूर : स्मार्ट कार्डला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

कोरोनामुळे राज्य शासनाच्या महसुलात तब्बल ३८ टक्‍क्‍यांपर्यंत घट झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारला कर्ज काढावे लागले आहे. शासनाच्या तिजोरीत जमा होणारा पैसा वेतनावरच खर्च होऊ लागला आहे. अनावश्‍यक खर्च कमी करून जमा झालेला महसूल अत्यावश्‍यक कामांवरच खर्च केला जात आहे. गृह, आरोग्य व मेडिकल विभागाशिवाय अन्य विभागांमधील रिक्‍त पदांची भरती थांबविण्यात आली आहे. अशी परिस्थिती असतानाही शासकीय सेवेतील अस्थायी स्वरुपातील पोलिस अधिकारी व कर्मचारी वेतनाच्या प्रतिक्षेत आहेत. पोलिस उपायुक्‍त डॉ. दिपाली धाटे यांनी त्यांच्यासाठी एक स्वतंत्र पत्र काढले आहे. त्यानुसार अस्थायी स्वरुपातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे पुढे कायम ठेवण्यासंबंधीचा निर्णय अजून झालेला नाही. तसे आदेश प्राप्त होताच सप्टेंबर महिन्याचे त्यांचे वेतन अदा केले जाईल, असेही त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. वेतनास थोडासा विलंब होईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: सोलापूर : सहा महिन्यांत ७२ हजार परवान्यांचे वाटप

शहर पोलिस आयुक्‍तालयातील अस्थायी पदांवरील काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे या महिन्यातील वेतन मिळालेले नाही. परंतु, त्यांना पुढील काही दिवसांत वेतन मिळेल.

- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्‍त, सोलापूर

loading image
go to top