

Solapur Crime:
sakal
सोलापूर: येथील विनायक नगर व कल्पना नगरातील खुले प्लॉट चौघांनी मिळून विकले. त्यापोटी चार लाख ३० हजार रुपये घेतले. तरीपण, चौघांनी मिळून मूळ मालकाच्या संमतीशिवाय प्लॉट परस्पर दुसऱ्याला विकून फसवणूक केली, अशी फिर्याद श्रीदेवी आप्पाशा मायनाळे (रा. आशीर्वाद नगर, मजरेवाडी) यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली. त्यावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.