

Ekanath Shinde takes strict action,dissolving shivsena commitees in solapur and mhada.
Sakal
सोलापूर: जिल्ह्यातील शिवसेनेच्या राजकारणाबाबत पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेची संपूर्ण कार्यकारिणी तडकाफडकी बरखास्त केली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या या थेट कारवाईमुळे जिल्ह्यातील शिवसेना नेते व पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आढावा बैठकीनंतर इतका मोठा निर्णय घेणार असल्याची कल्पना एकाही पदाधिकाऱ्यास नव्हती. नवीन पदाधिकारी नियुक्तीसाठी मतदारसंघनिहाय मुलाखती घेण्यात येणार आहेत, त्यानंतरच नवीन पदाधिकारी निवड करण्यात येणार आहेत.