Praniti Shinde I मी आमदार माझ्या घरी, इथे तुमची सेवक, चुकल्यास कान धरा आणि घरी बसवा - प्रणिती शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रणिती शिंदे

मी आमदार असेल माझ्या घरी, इथे मी तुमची नोकर आहे - प्रणिती शिंदे

'मी आमदार माझ्या घरी, इथे तुमची सेवक, चुकल्यास कान धरा अन् घरी बसवा'

मी आमदार असेल माझ्या घरी, इथे मी तुमची नोकर आहे. जर मी तुमची काम केली, तर पाठीवर थापही द्या, मला तितकचं पुरेसं आहे, अशा भावना प्रणिती शिंदें यांनी व्यक्त केल्या आहेत. लहानपणापासून मी लालबत्तीच्या गाडीत फिरले आहे आणि सत्ता काय असते हे मी बघितलंय, सत्तेसाठी मी राजकारणात आलेली नाही, मला लोकांची कामे करायची होती, असेही शिंदे (Praniti Shinde) यांनी यावेळी स्पष्ट केलं. सोलापुरातील यंत्रमाग धारक संघाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

हेही वाचा: 'माळवागद गावची घटना महाआघाडीच्या पुरोगामीपणाचा बुरखा फाडणारी'

यावेळी त्या म्हणाल्या, मी राजकारणात आले कारण मला समाजकारण करायचं होतं. माझे वडील हे देशाचे गृहमंत्री, ऊर्जामंत्री राज्याचे मुख्यमंत्री, आंध्रप्रदेशचे राज्यपाल होते. लहानपणापासून मी लालबत्तीच्या गाडीत फिरले आहे. राजकारणात येण्यापुर्वी सोलापूर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काम करायचं. त्यानंतर मी सोलापूर शहर मध्य मतदारसंघ निवडला, हे माझ्या वडिलांना सांगताच त्यांनी मला राजकारणात येण्यास आणि निवडणूक लढवण्यास विरोध केला. पण मला माझ्या समाजकारणातील क्षेत्र वाढवायचं असल्यानं मी हा निर्णय घेतला, असंही त्यांनी सांगितलं.

पुढे त्या म्हणाल्या, मला टक्केवारी, कमिशनचं राजकारण अजून ही जमत नाही आणि कधीही जमू नये, पण जर तस मी कधी केलं तर माझे कान धरुन मला खाली बसवा, छडी तुमच्या हातात आहे. मी आमदार असेल माझ्या घरी, इथे मी तुमची नोकर आहे. जर तुम्हाला कधीही असं वाटलं तर तुम्ही मला घरी बसवा. पण जर मी तुमची काम केली, तर पाठीवर थापही द्या, मला तितकचं पुरेसं आहे, अशा भावनाही प्रणिती शिंदेंनी व्यक्त केल्या.

हेही वाचा: 'उत्तर'साठी 'मातोश्री'वरून हलली सूत्रं; अस्लम सय्यद यांची माघार

Web Title: Praniti Shinde Says I Mla In My House Here I Am Your Servant

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top