पितृपक्ष पंधरवड्याला महागाईची फोडणी! भाज्यांचे दर मात्र स्थिर

पितृपक्ष पंधरवड्याला महागाईची फोडणी! भाज्यांचे दर मात्र स्थिर
Summary

गेल्या चार-पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे बाजारातील भाजीपाला खराब होत असल्याने भाजीपाल्याचे दर मात्र गडगडले आहेत.

केतूर (सोलापूर): पितृपक्ष पंधरवडयामुळे बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याची (तरकारी) आवक मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. त्यातच, गेल्या चार-पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे बाजारातील भाजीपाला खराब होत असल्याने भाजीपाल्याचे दर मात्र गडगडले आहेत. तर किराणामाल मालाची धर्मातील वरचेवर वाढत असल्याने पितृपक्ष पंधरवड्याला महागाईची फोडणी बसल्याचे दिसून येत आहे.

पितृपक्ष पंधरवड्याला महागाईची फोडणी! भाज्यांचे दर मात्र स्थिर
पितृपक्ष 2021 : भारतातच नव्हे, 'या' देशांमध्येही करतात पुर्वजांचे स्मरण!

सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू आहे. आपल्या पूर्वजांना पुरणपोळीसह विविध शाकाहारी भाज्यांचा नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे. पूर्वजांच्या स्मरणार्थ भाऊबंदकी, शेजारी-पाजारी तसेच मित्रपरिवार यांना जेवणावळीच परंपरा आहे. या जेवणावळी मध्ये मेथी, बटाटा, गवार, काकडी, भेंडी, कारले, लिंबू, आळू आदी भाज्यांना विशेष महत्त्व असते. त्यातच सर्व भाज्यांना मागणी वाढली आहे. यावर्षी पुरेशा प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतीमध्ये भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. त्यातच पितृपक्ष पंधरवडा या पार्श्वभूमीवर मागण्या प्रमाणे भाज्या उपलब्ध होत असल्या तरी इतर किराणा मालाचे दर मात्र वरचेवर वाढत असल्याचेच दिसून येत आहे.

पितृपक्ष पंधरवड्याला महागाईची फोडणी! भाज्यांचे दर मात्र स्थिर
पितृपक्ष : ना गाय, ना श्वान श्राद्ध केले की कावळ्यालाच देतात नैवेद्य.. पण का? जाणून घ्या शास्त्रीय कारण 

गेल्या एक-दीड वर्षापासून पितृपक्ष पंधरवड्यात कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे जेवणावळीला आमंत्रणे कमी झाली होती परंतु, सध्या मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वरचेवर कमी होत असल्याने ही आमंत्रणे आता मात्र वाढली असल्याचे दिसून येत आहे.

पितृपक्ष पंधरवड्याला महागाईची फोडणी! भाज्यांचे दर मात्र स्थिर
पितृपक्ष : श्राद्ध व तिथीचे महत्त्व; ज्योतिषाचार्य सांगतात

सध्या भाजीपाल्याची दर

- मेथी - 5 ते 7 रु.पेंडी

- कोथिंबीर - 5 रु

- गवार-20 रु.किलो

- भेंडी -35

- टोमॅटो-15

- कारले- 30

- दोडका -20

- वांगी-40

- बटाटा-15

- हिरवी मिरची-35

- आळूची पाने 2 रु.नग

ऐन पितृपक्ष पंधरवड्यात भाजीपाल्याचे दर कमी असल्याने दिलासा मिळाल्याचे बहुतांश गृहिणींनी "सकाळ"शी बोलताना सांगितले. दरम्यान पितृपक्ष पंधरवड्यातही भाजीपाल्याचे दर न वाढल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी मात्र निराश झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com