
"मराठ्यांच्या पोरांचं आरक्षण बांधलं काठीला, महाविकास आघाडी सरकार निघालं काशीला !'
टेंभुर्णी (सोलापूर) : मराठा आरक्षणाच्या (Maratha Community Reservation) समर्थनार्थ व महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi government) निषेधार्थ "माझे अंगण हेच रणांगण' या अनोख्या पद्धतीने "मराठ्यांच्या पोरांचं आरक्षण बांधलं काठीला, महाविकास आघाडी सरकार निघाले काशीला' हे घोषवाक्य घेऊन उजनी (टें) येथे सोलापूर जिल्हा रयत क्रांती संघटनेचे (Rayat Kranti S00anghatna) जिल्हाप्रमुख तथा राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी सदस्स प्रा. सुहास पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन (Agitation) केले. (Rayat Kranti Sanghatana's agitation for Maratha reservation at Tembhurni)
हेही वाचा: युवकांनी सोडवला माकडांच्या अन्नपाण्याचा प्रश्न ! विविध स्तरांतून सुरू मदतीचा ओघ
महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. याचा निषेध म्हणून मंगळवारपासून (ता. 11) आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या वेळी प्रा. पाटील म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी आग्रही भूमिका घेत राज्यात मराठा आरक्षण लागू केले. परंतु महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडले म्हणून न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले. या निर्णयाच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करीत आहोत.
हेही वाचा: तब्बल 19 महिन्यांनंतर शिवसेना संपर्कप्रमुख आमदार सावंत ऍक्टिव्ह !
प्रा. पाटील पुढे म्हणाले, मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीमध्ये, आर्थिकदृष्ट्या आरक्षण मिळणे गरजेचे आहे. मराठा समाजातील विद्यार्थी शैक्षणिक सुविधा व नोकरीतील आरक्षणापासून वंचित राहिला आहे. मराठा समाजावर हा एकप्रकारे अन्याय होत आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी मराठा समाजाने विना नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन उभे केले. परंतु महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात अपयशी ठरले, म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले. हा मराठा समाजावर झालेला अन्यायच आहे. रयत क्रांती संघटनेच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
या वेळी विश्वजित पाटील, ऋषिकेष पाटील, दिनेश मेटे- पाटील, यशराज पाटील, दिग्विजय फंड, मधुरा पाटील, विश्वतेज पाटील आदी सहभागी झाले होते.
Web Title: Rayat Kranti Sanghatanas Agitation For Maratha Reservation At
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..