दक्षिण सोलापूर (सोलापूर) ः राष्ट्रीय एकता दिन व भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त कुंभारी (ता.दक्षिण सोलापूर) येथे आज (ता.31) वृक्षारोपणासह युवकांशी संवाद साधत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली.
हेही वाचाः मंगळवेढ्यात बायपास असूनही जड वाहतूक शहरातूनच
येथील जैवविविधता उद्यानात सरपंच सिद्धाराम इमडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तर वि. दा. सावरकर सभागृहात युवासंवाद कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य आण्णाराव बाराचारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चाणक्य गुरुकुलचे काशिनाथ भतगुणकी, सैनिक ऍकॅडमीचे संस्थापक उमेश जाधव, इन्फोसिसचे कॉर्पोरेट ट्रेनर स्वप्निल चौधरी, रामचंद्र होनराव, संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य राहुल गाडेकर, सागर तेली, बाबुराव रामपुरे, केदार छपेकर, सचिन सुतार, धीरज छपेकर, इरेश कटारे, माणिक रेड्डी, सचिन जोशी, सुरज पाटील, महेश खसगे, सुरेश चांगले, पंडित इमाडे, अपालाल बिराजदार, नितीन कुलकर्णी, राजशेखर अंदोडगी, सलीम शेख, गेनसिद्ध कांबळे, लखन चांगले आदीसह युवक व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना अखंड हिंदुस्थानची बांधणी सरदार पटेल यांनी केल्याचे सांगत आधुनिक भारताच्या उभारणीसाठी युवकांनी शेती, शिक्षण, प्रशासन, राजकारण, आरोग्य, उद्योग यासह विविध क्षेत्रांमध्ये आपल्या क्षमतेनुसार योगदान द्यावे असे श्री. भतगुणकी यांनी आवाहन केले. आजच्या स्पर्ध्येच्या युगात प्रत्येकानी संवाद, अभ्यास, मुलाखत, तंत्रज्ञान अशी कौशल्ये विकसित करावीत असे स्वप्नील चौधरी यांनी सांगितले. तर ग्रामीण भागातील तरुणांनी आगामी होणाऱ्या पोलीस भरतीचा मोठया प्रमाणात लाभ घ्यावा असे उमेश जाधव यांनी सांगितले.
संपादनः प्रकाश सनपूरकर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.