Solapur Fraud
सोलापूर: येथील नवीन आरटीओ ऑफिसजवळ राहणाऱ्या निवृत्त बॅंक अधिकाऱ्यास सायबर गुन्हेगारांनी ६० लाख रुपयाचा गंडा घातला आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास खूप जास्त पैसे मिळतील, असे आमिष त्यांना दाखविले होते. ५ जुलै ते १७ डिसेंबर या सहा महिन्यांत त्यांनी नातेवाइकांकडून पैसे घेतले, घरातील दागिने मोडले, स्वत:चेही पैसे त्यात गुंतवले होते. सोलापूर शहर सायबर पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.