रस्ते अपघात कमी व्हायलाच हवेत! महामार्ग सुरक्षा पोलिसांची धडपड; आता शाळांमध्ये जनजागृती

महामार्ग सुरक्षा पथकाचे अप्पर पोलिस महासंचालक रविंद्र सिंगल, अधीक्षक श्रीमती फड, उपअधीक्षक टोणपे, निरीक्षक योगेश वेळापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार भारत सांगळे, श्री. लठ्ठे व इतर सहकाऱ्यांनी महामार्गावरील शाळांमध्ये वाहतूक जागरण मोहीम राबविली.
highway police, solapur
highway police, solapur sakal

सोलापूर : पाकणी येथील महामार्ग सुरक्षा पथकाच्या वतीने विविध शाळांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत मार्गदर्शन केले. वाहतुकीच्या नियमांबरोबरच नियम न पाळल्यास होणाऱ्या दुष्परिणामाचीही यावेळी अधिकाऱ्यांनी मुलांना माहिती दिली. यावेळी प्रत्येक मुलांनी आपण आयुष्यात कधीही वाहतूक नियम मोडणार नाही, असा संकल्प केला.

महामार्ग सुरक्षा पथकाचे अप्पर पोलिस महासंचालक रविंद्र सिंगल, अधीक्षक श्रीमती फड, उपअधीक्षक टोणपे, निरीक्षक योगेश वेळापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार भारत सांगळे, श्री. लठ्ठे व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी पुणे- सोलापूर महामार्गावरील शाळांमध्ये वाहतूक जागरणाची मोहीम राबविली.

रस्ता ओलांडताना डावीकडे व उजवीकडे वाहने नसल्याची खात्री करुनच रस्ता ओलांडावा, वाहतुकीवेळी स्वतःची काळजी कशी घ्यावी याबाबत त्यांनी प्रबोधन केले. याबरोबरच विजयपूर महामार्गावरील नांदणी येथील जिल्हा परिषद शाळेतही वाहतुकीबाबत मार्गदर्शन केले. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. प्रबोधन व कारवाई, यातूनच अपघात कमी होतील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. अपघाती मृत्यूनंतर आपल्या कुटुंबाची कशी वाताहत होते, यावरही त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

चारचाकीतील सर्वांनी सिटबेल्ट वापरावाच

चारचाकी वाहन वापरताना वाहनाच्या चालकासहल सर्वच प्रवाशांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सिटबेल्ट वापरणे बंधनकारक असल्याचे प्रबोधनावेळी सांगण्यात आले. समोरील वाहनांच्या वेगाचा अंदाज येत नसतो. त्याचा वेग लक्षात घेऊन वाहन चालविण्याची गरज असते. तरीही अचानक ब्रेक मारल्यानंतर पाठीमागून धडक देण्याचे प्रमाण वाढत आहे. गतिरोधकाच्या ठिकाणी असे प्रकार सतत घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. दुसरीकडे वाहनांवरील प्रलंबित दंड भरणे गरजेचे असून नियमनांचे पालन सर्वांनीच करावे असे आवाहन फौजदार सांगळे यांनी केले. त्यांना शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com