

Rohit Pawar
sakal
सोलापूर : विधानपरिषदेच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: इच्छुक असतील तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा व काँग्रेसचा नक्कीच पाठिंबा राहील. राज्यसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठिंबा देण्यात उद्धव ठाकरे यांनी सर्वात प्रथम पुढाकार घेतला होता. ठाकरेंना पुन्हा आमदार करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल. या आमदारकीवर उद्धव ठाकरे यांचा हक्क आहे. आम्ही खासदारकी घेतल्याने आम्ही हक्क सांगणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज सोलापुरात सांगितले.