esakal | आरपीआय स्वबळावर लढवणार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
sakal

बोलून बातमी शोधा

आरपीआय स्वबळावर लढवणार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

सोलापूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे महाराष्ट्र राज्य संघटन सचिव सुनील सर्वगोड यांनी केली.

आरपीआय स्वबळावर लढवणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

sakal_logo
By
अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local body elections) स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (Republican Party of India) (आठवले) चे महाराष्ट्र राज्य संघटन सचिव सुनील सर्वगोड (Sunil Sarwgod) यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर (Pandharpur) येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या सोलापूर जिल्हा कार्यकारिणीची सभा झाली. त्याप्रसंगी त्यांनी ही घोषणा केली. जिल्हाध्यक्ष अशोक सरवदे अध्यक्षस्थानी होते.

हेही वाचा: करमाळा बाजार समिती सचिवपदी क्षीरसागर! बंडगर, बागल गटाला धक्का

याप्रसंगी जिल्ह्यातील सर्व तालुका प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त करून पक्षाचे राज्य संघटन सचिव सुनील सर्वागोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यकारिणी जो निर्णय घेईल त्याप्रमाणे काम करू, असे जाहीर केले. सुनील सर्वगोड यांनी पक्षाचे नेते, केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार आपण काम केले पाहिजे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्यास कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असे आवाहन केले.

या वेळी सांगोला, मंगळवेढा, माळशिरस, माढा, करमाळा, बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, सोलापूर, मोहोळमधून आलेल्या विविध पदाधिकाऱ्यांनी मागणी केल्यानुसार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपुरात एक स्वतंत्र महामेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा: दमदार पावसामुळे सीना नदीवरील चार बंधारे पाण्याखाली !

बैठकीत रिक्त असलेल्या पंढरपूर शहर सरचिटणीसपदी प्रशांत लोंढे, पंढरपूर युवक तालुकाध्यक्षपदी रणजित कांबळे, पंढरपूर युवक शहराध्यक्षपदी विशाल मांदळे यांची नियुक्ती करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष अशोक सरवदे यांनी शुभेच्छा दिल्या. बैठकीस राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार, जिल्हा कार्याध्यक्ष अजित गायकवाड, जिल्हा सरचिटणीस सूरज बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष उत्तम गायकवाड, युवक प्रदेश उपाध्यक्ष ऍड. कीर्तिपाल सर्वगोड, पश्‍चिम महाराष्ट्र सचिव नागनाथ ओहोळ, पश्‍चिम महाराष्ट्र संघटक दयानंद धाईंजे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण बनसोडे, सोलापूर शहराध्यक्ष सुधीर बिडबाग, सोलापूर युवक शहराध्यक्ष लखन चंदनशिवे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश सावंत, भारत आठवले, श्‍याम भोसले, पश्‍चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष राजाभाऊ भोसले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

loading image
go to top