आवताडे, परिचारक युतीचा विजय ! भालकेंची कडवी झुंज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवताडे, परिचारक युतीचा विजय ! भालकेंची कडवी झुंज

या दोन्ही नेत्यांना एकत्र आणण्याच्या भारतीय जनता पक्षाने आखलेल्या रणनितीचा विजय झाला. दोन्ही पक्षांकडून प्रतिष्ठेच्या केल्या गेलेल्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला अस्मान दाखवले.

आवताडे, परिचारक युतीचा विजय ! भालकेंची कडवी झुंज

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत समाधान आवताडे आणि आमदार प्रशांत परिचारक यांची युती यशस्वी ठरली. या दोन्ही नेत्यांना एकत्र आणण्याच्या भारतीय जनता पक्षाने आखलेल्या रणनितीचा विजय झाला. दोन्ही पक्षांकडून प्रतिष्ठेच्या केल्या गेलेल्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला अस्मान दाखवले. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायचीच या भूमिकेतून राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणूक लढवली परंतु मतदानाच्या आदल्या दिवशी आणि प्रत्यक्ष मतदानादिवशी भालके यांची यंत्रणा कमी पडल्याने भालके पराभूत झाले.

हेही वाचा: मंगळवेढ्याच्या भूमिपुत्राला तब्बल 40 वर्षांनंतर संधी

राज्यपातळीवर अनेक घडामोडी सुरु असताना महाविकास आघाडीकडील जागा आपल्याकडे खेचून घेण्यात भाजपने यश मिळवले हे विशेष मानले जात आहे. कोरोनाच्या सावटाखाली झालेल्या या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने संसर्ग वाढीचा विचार न करता गर्दीत सभा घेतल्या. खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका एका दिवशी सहा, सहा सभा घेतल्या. राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी भालके यांच्यासाठी हिरीरीने प्रचार केला. आवताडे यांच्यासाठी तर भाजपच्या अनेक आजी-माजी मंत्र्यांनी, आमदारांनी पंढरपुरात काही दिवस तळच ठोकला होता.

हेही वाचा: कोणी काही म्हणो, जिल्ह्याचे नेतृत्व मोहिते-पाटीलच करू शकतात !

राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायची या जिद्दीने यंत्रणा राबवली. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडील ही जागा पुन्हा जिंकली तर महाविकास आघाडी विषयी जनतेच्या मनात विश्वास असल्याचे सिध्द झाल्याचे सांगता येईल, या हेतूने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतेमंडळींनी प्रयत्न केला. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या ताब्यातील ही जागा जिंकून महाविकास आघाडीविषयी जनतेत असलेली नाराजी मतदारांनी व्यक्त केल्याचा नारा देता येईल, या भूमिकेतून भाजपने अतिशय नियोजनबध्द यंत्रणा राबवली. भाजपने परिचारक आणि आवताडे या पंढरपूर आणि मंगळवेढ्यातील दोन मोठ्या गटांची ताकद एकत्र आणली. विशेष म्हणजे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी देखील समाधान अवताडे यांना विनाअट पाठिंबा दिला. त्यामुळे आवताडे यांना हत्तीचे बळ मिळाले.

Web Title: Samadhan Avtade And Mla Prashant Paricharak Alliance Was Successful In The By Election In Pandharpur Mangalvedha Assembly

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top