
सोलापूर/सांगोला : सांगोल्यातील यलमार मंगेवाडी व पंढरपूर तालुक्यातील करकंब, पोहोरगाव आणि कासेगाव येथील दहा जणांनी बनावट कागदपत्रे सादर करून फेड बॅंक फायनान्सची ७२ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. १ जानेवारी २०२२ रोजी रेल्वे लाइन परिसरातील विरटेक्स बिल्डिंग पंपाजवळ या सर्वांनी फसवणूक केल्याची फिर्याद दिगंबर संदीपान फुले (रा. कळसगाव, पुणे) यांनी सदर बझार पोलिसांत दिली आहे. त्यावरून दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.