

Anthill Turned Honeybee Kingdom: Stunning Symbol of Natural Harmony
Sakal
रोपळे बुद्रूक : शेतशिवारातील जुन्या वारुळाजवळ उभा राहिल्यावर मातीची अनियमित भेगा, खोल अंधारात विरलेली पोकळी अन् आसपास शांतता. पण थोडा वेळ थांबल्यावर त्या अंधारातून मंद गुंज ऐकू आली. जणू निसर्ग स्वतः श्वास घेत होता. चमकदार पंखाच्या रेषा आणि क्षणात समोर उलगडले जैवविविधतेच एक अद्भुत दृश्य. अंतःस्थ वारुळात दाट पंक्तीत राहिलेल्या सातेरी मधमाशांचे राजघराणे. वारुळात या मधमाशांनी आपले साम्राज्यच उभं केलं होत.