esakal | उत्तर तालुक्‍यात पंतप्रधान आवास योजनेसाठी 7282 प्रस्ताव
sakal

बोलून बातमी शोधा

उत्तर तालुक्‍यात पंतप्रधान आवास योजनेसाठी 7282 प्रस्ताव

उत्तर तालुक्‍यात पंतप्रधान आवास योजनेसाठी 7282 प्रस्ताव

sakal_logo
By
दयानंद कुंभार

लवकरच तालुक्‍यातील 36 गावांतील नागरिकांचे घराचे स्वप्न दृष्टिक्षेपात येणार आहे.

वडाळा (सोलापूर) : उत्तर सोलापूर तालुक्‍यात (North Solapur taluka) पंतप्रधान आवास योजनेसाठी (Prime Minister's Housing Scheme) सात हजार 282 घरकुल लाभार्थ्यांचे ऑनलाइन जॉबकार्ड लिंक करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तालुक्‍यातील एकूण 92 टक्के काम पूर्ण झाले आहे. यामुळे लवकरच तालुक्‍यातील 36 गावांतील नागरिकांचे घराचे स्वप्न दृष्टिक्षेपात येणार आहे. सध्या तालुक्‍यातील घरकुल सात हजार 282 प्रस्तावांपैकी सध्या सहा हजार 682 लाभार्थ्यांचे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत (MREGS) जॉबकार्ड ऑनलाईन लिंक करण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण होणार आहे. यानंतर ही यादी शासनाच्या वरिष्ठ पातळीवर अंतिम पात्रतेसाठी पाठविली जाणार आहे. शासनाच्या मंजुरीनंतर अंतिम यादी ग्रामपंचायतीस सादर होणार आहे. शासनाचे मार्गदर्शक आदेश प्राप्त झाल्यानंतर घरकुल लाभार्थांना मंजुरी आदेश मिळणार आहे. (Seven thousand proposals were received for the Prime Minister's Housing Scheme in North taluka-ssd73)

हेही वाचा: सोलापूरच्या 'पद्म'कन्येला विदेशात एक कोटीच्या नोकरीची ऑफर !

घरकुल लाभार्थ्यांची जॉबकार्ड ऑनलाइन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून काम पूर्ण होताच ही यादी वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठाविण्यात येणार आहे. यानंतर शासन आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

- डॉ. जास्मीन शेख, गटविकास अधिकारी, उत्तर सोलापूर

हेही वाचा: दरबार जनतेचा, अजितदादांपर्यंत पोहोचण्याचा !

पंतप्रधान आवास योजनेसाठी गावनिहाय प्रस्ताव असे...

 • भागाईवाडी - 59

 • कोंडी - 646

 • पडसाळी - 122

 • वांगी - 47

 • कळमण - 57

 • गुळवंची - 180

 • तळे हिप्परगा - 342

 • हगलूर - 81

 • एकरुक - 37

 • दारफळबीबी - 312

 • सेवालाल नगर - 99

 • होनसळ - 109

 • खेड - 124

 • हिरज - 315

 • राळेरास - 37

 • तेलगाव - 112

 • पाथरी - 85

 • तिऱ्हे - 266

 • बेलाटी - 124

 • साखरेवाडी - 129

 • वडाळा - 135

 • भोगाव - 147

 • बाणेगाव - 135

 • नान्नज- मोहितेवाडी - 400

 • मार्डी- 681

 • अकोलेकाटी - 362

 • कारंबा - 188

 • रानमसले - 363

 • पाकणी 240

 • नरोटेवाडी - 50

 • दारफळगावडी - 139

 • कवठे - 246

 • शिवणी - 62

 • डोणगाव - 266

 • नंदूर - 60

 • कौठाळी - 225

loading image