

Shaktipeeth Highway Joint Measurement In Solapur From September 15 To Record Affected Land Trees Wells Houses And Borewells
sakal
सोलापूर : शक्तिपीठ महामार्गाची संयुक्त मोजणी १५ सप्टेंबरपासून होणार आहे. सार्वजनिक बांधकाम, कृषीसह संबंधित विभागाच्या वतीने संयुक्त मोजणी सुरू होणार आहे. महाराष्ट्राचे रस्ते विकास महामंडळाकडून निधी आल्यानंतर भूसंपादन प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.