

Shocking crime in Solapur raises concerns over women’s safety and justice.
sakal
सोलापूर: नवी पेठेतील कापड दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने वारंवार अत्याचार केले. ती गर्भवती असल्याचे समजताच त्याने गोळ्या खायला दिल्या. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलिसांनी संशयित तरुणास अटक केली आहे. सुजल नुले (वय २१, रा. सोलापूर) असे त्या संशयिताचे नाव आहे.