भाजपच्या श्रीकांत देशमुखांना शिवसेनेच्या बरडेंचा दम !

भाजपच्या श्रीकांत देशमुखांना शिवसेनेच्या बरडेंचा दम! गावात येऊन प्रत्युत्तर देण्याचा इशारा
भाजपच्या श्रीकांत देशमुखांना शिवसेनेच्या बरडेंचा दम! गावात येऊन प्रत्युत्तर देण्याचा इशारा
भाजपच्या श्रीकांत देशमुखांना शिवसेनेच्या बरडेंचा दम! गावात येऊन प्रत्युत्तर देण्याचा इशाराCanva
Updated on: 
Summary

'सोलापुरात येऊन तुम्ही उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळणे, हे चुकीचे आहे. तुमच्या गावात येऊन आम्ही तुम्हाला प्रत्युत्तर देऊ' असा दम पुरुषोत्तम बरडे यांनी श्रीकांत देशमुख यांना दिला.

सोलापूर : ओबीसी (OBC) समाजाला राजकीय (Political reservation) आरक्षण मिळावे, या मागणीसाठी बुधवारी भाजपने (BJP) केलेल्या आंदोलनात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या आंदोलनाचे नेतृत्व श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) यांनी केले होते. या आंदोलनानंतर 'उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहेत. सोलापुरात येऊन तुम्ही उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळणे, हे चुकीचे आहे. तुमच्या गावात येऊन आम्ही तुम्हाला प्रत्युत्तर देऊ' असा दम शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे (Purushottam Barde) यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) यांना दिला. या दोघांतील संभाषणाची क्‍लिप समाज माध्यमात व्हायरल झाली आहे.

भाजपच्या श्रीकांत देशमुखांना शिवसेनेच्या बरडेंचा दम! गावात येऊन प्रत्युत्तर देण्याचा इशारा
विधानपरिषद निवडणुकीचा अंदाज येईना अन्‌ रणनीतीही ठरेना!

या संभाषणात श्रीकांत देशमुख यांनी, "तुम्ही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची छायाचित्रे सर्व मुताऱ्यांवर लावली यावर आम्ही काही म्हणालो होतो का' असा बचावात्मक पवित्रा घेतला आहे. यावर पुरुषोत्तम बरडे म्हणाले की, राणे कुठे, उद्धव ठाकरे कुठे? सर्व पक्ष बदलत आलेले नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बरोबरी करता येणार नाही. तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात, जिल्ह्याचे राजकारण करावे, असेही ते म्हणाले. श्रीकांत देशमुख आणि पुरुषोत्तम बरडे यांच्यातील संभाषणावरून समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.

भाजपच्या श्रीकांत देशमुखांना शिवसेनेच्या बरडेंचा दम! गावात येऊन प्रत्युत्तर देण्याचा इशारा
राष्ट्रवादीकडे मामा पण कॉंग्रेसकडे साहेब अन्‌ ताई!

...अन्‌ तुम्ही ओबीसींचे राजकरण करता काय?

या संभाषणात पुरुषोत्तम बरडे हे श्रीकांत देशमुख यांना म्हणाले, अहो तुम्ही मराठा आरक्षणाच्या मोर्चासाठी सकल मराठा समाजाची पन्नास हजारांची वर्गणी दिली नाही. मराठा आरक्षणावर बोलत नाहीत आणि तुम्ही ओबीसी समाजाचे राजकारण करायला निघालात. असा टोलाही बरडे यांनी लगावला. ही ऑडिओ क्‍लिप समाज माध्यमातून व्हारयल झाल्यावर अनेकांनी टीका-टिप्पणी सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com