

Siddheshwar Sugar Factory receives ₹200 crore loan guarantee; MLA Sachin Kalyanshetti lends crucial support as crushing season begins.
Sakal
सोलापूर: अडचणींचा सामना करत असलेल्या श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मदतीला आमदार सचिन कल्याणशेट्टी धावले. त्यामुळे अखेर कारखान्याच्या २०० कोटींच्या कर्जास राज्य सरकारने थकहमी दिली आहे. त्यानंतर मंगळवारी (ता. ११) कारखान्याने गाळप हंगामाचा शुभारंभ केला. यावेळी बोलताना कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी आमदार कल्याणशेट्टी यांच्यासह राज्य सरकारचे आभार मानले. तसेच या हंगामातही अन्य कारखान्यांच्या तुलनेत चांगला दर देण्याची ग्वाही दिली.