Sixteen sugar mills in Solapur district have not yet declared the sugarcane price
Sakal
सोलापूर
Solapur News:'साेलापूर जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांची ऊस दराबाबत चुपी'; शेतकरी संभ्रमात, 'स्वाभीमानी'चा अंदोलनाचा इशारा !
Solapur Sugar Mills:सोलापूर जिल्ह्यातील तब्बल १६ साखर कारखान्यांनी उसाच्या दराबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. दर हंगामाच्या सुरुवातीलाच दर जाहीर होण्याची अपेक्षा असतानाही कारखान्यांची सुरू असलेली चुपी शेतकऱ्यांच्या संभ्रमात भर घालत आहे.
मोहोळ : सोलापूर जिल्ह्यातील 16 साखर कारखान्यांनी उसाचा दर जाहीर केला आहे. मात्र उर्वरित 16 साखर कारखान्यानी शासनाने कळवून, बैठक होऊन ही ऊस दर अद्याप जाहीर केला नाही. ज्या साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला आहे त्यांनी सरासरी 2 हजार 800 रुपये प्रमाणे जाहीर केला आहे. तो शेतकऱ्यांना न परवडणारा आहे. कारण चालू वर्षी रासायनिक खताचे वाढते दर, वाढती मजुरी, ट्रॅक्टर व बैलाचे वाढलेले भाडे, शासनाची वाढलेली पाणीपट्टी यांचा हिशोब घातला तर जाहीर केलेल्या ऊस दरा बाबत शेतकऱ्यां मधून संताप व्यक्त होत आहे. पहिली उचल किमान 3 हजार 200 ते 3 हजार 500 मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

