सोलापूर : कोरोनामुळे १५० वर्षांची परंपरा खंडित

नंदीध्वजासह चाळीस तास अन्‌ साठ किलोमीटर प्रवास
Shri Siddheshwar Mandir
Shri Siddheshwar Mandirsakal

सोलापूर : श्री सिद्धरामेश्‍वरांच्या (Shri Siddheshwar Mandir) यात्रेतील मुख्य आकर्षण होते ते नंदीध्वज मिरवणूक ६८ लिंगाच्या तैलाभिषेकाने मानकऱ्यांचा पाच दिवसांचा उपवास आणि नंदीध्वज मिरवणुकीला सुरुवात होते. त्यानंतर अक्षता सोहळा, होमहवन, शोभेचे दारुकाम, कपड्डकळी हे सर्व विधी नंदीध्वजाच्या साक्षीनेच होतात. सलग पाच दिवस निघणाऱ्या नंदीध्वज मिरवणुकीत भाविक ४० तासात ६० किलो मीटरचा प्रवास हा पायी करत असतात. श्री सिद्धरामेश्‍वरांवरील त्यांची श्रध्दा आणि भक्तीमुळे यात्रेतील परंपरा कायम होती. मात्र कोरोनामुळे १५० वर्षाच्या परंपरेत मागील दोन वर्षापासून खंड पडला आहे.

Shri Siddheshwar Mandir
मराठीचा वापर करण्याची सूचना देणारा आदेशच इंग्रजीमध्ये

महिनाभर चालणाऱ्या श्री सिध्दरामेश्‍वरांच्या यात्रेत पाच दिवस मुख्य धार्मिक उपक्रम होतात. मानवजातीच्या उद्धारासाठी श्री सिद्धरामेश्‍वरांनी ६८ लिंगाची स्थापना केली. श्री सिद्धरामेश्‍वर यात्रेतील सातही नंदीध्वज हे श्री सिद्धरामेश्‍वरांच्या योगदंडाचे प्रतिक आहेत. त्यामुळे श्री सिध्दरामेश्‍वरांच्या अक्षतासोहळ्याचे निमंत्रण या ६८ लिंगाना देण्यासाठी अक्षता सोहळ्यापूर्वी तैलाभिषेकाचा धार्मिक कार्यक्रम होतो. त्याकरिता शहरात ठिकठिकाणी वसलेल्या ६८ लिंगांना नंदीध्वज मिरवणुकीने प्रत्येक लिंगाजवळ विडा देण्यात येते. सकाळी ८ वाजता यण्णीमंजनासाठी हिरेहब्बू वाड्यातून नंदीध्वज निघाले असता २१ किलोमीटर अंतरामध्ये स्थापिलेल्या ६८ लिंगांचा धार्मिक विधी उकरून परत नंदीध्वज हिरेहब्बू वाड्यात येण्यास तब्बल १२ तासांचा कालावधी लागत असे. अक्षता सोहळ्यानंतर पुन्हा ६८ लिंग दर्शनासाठी नंदीध्वज मिरवणूक निघते ती रात्री एक वाजता मल्लिकार्जुन मंदिरात येत असे.

Shri Siddheshwar Mandir
Latur Rain : लातूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस अन् गारपीट; ज्वारी,गव्हाचे नुकसान

विवाहाच्या दुसऱ्या दिवशी कुंभारकन्या सती जात असल्याने त्याच्या प्रतिकात्मक होमहवनाचा धार्मिक कार्यक्रम आणि यात्रेच्या चौथ्यादिवशी शोभेचे दारुकाम होते. या दोन्ही दिवशी नागफणी व इतर सजावटीने हिरेहब्बू वाड्यातून नंदीध्वजांची मिरवणूक निघतात. शेवटच्या दिवशी कपड्डकळीला नंदीध्वजांची मिरवणूक व यात्रेचा सांगता समारोप श्री सिद्धेश्‍वर मंदिरात होतो. अशा एकंदरीत सलग पाच दिवस तब्बल ४० तासांची ६० किलो मीटर अंतरावरून नंदीध्वज मिरवणूक निघते. नंदीध्वज धरणारे मास्तर, मानकरी हे सलग पाच दिवसांचा उपवास धरून ही विधी न थकता पूर्ण करतात. गेली दोन वर्षे ही पंरपरा खंडित झाल्याने नंदीध्वज मिरवणूक निघाली नाही.

बाराबंदीऐवजी खाकी वर्दीची गर्दी

श्री सिद्धरामेश्‍वरांच्या महायात्रेत सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणून डौलाने निघणारे सात नंदीध्वजांची शाही मिरवणूक निघते. या यात्रेत बाराबंदी पोशाखातील मानकरी, भाविकांची संख्या ही आठ ते दहा हजारांच्या संख्येत असते. बाराबंदीतील भक्‍तांच्या शिस्तबद्ध यात्रेमुळे संपूर्ण शहर भक्‍तिरसात बुडाल्याने डोळ्यांचे पारणे फेडणारी मिरवणूक पाहावयास मिळत असे. परंतु कोरोनाच्या सावटाखाली होणाऱ्या उत्सवात बाराबंदीऐवजी खाकी वर्दीची गर्दी अधिक दिसून आली.

Shri Siddheshwar Mandir
शरद पवारांच्या अडमुठ्या धोरणामुळं ६७ कष्टकऱ्यांचा जीव गेला - सदावर्ते

अशी होती पाच दिवसांची शाही मिरवणूक

  • पहिला दिवस : तैलाभिषेकासाठी ६८ लिंग यात्रा. १२ तासांचा २१ कि.मी मार्गावरून नंदीध्वज मिरवणूक

  • दुसरा दिवस : अक्षता सोहळ्यासाठी हिरेहब्बू वाड्यातून सिद्धेश्‍वर मंदिर तेथून पुन्हा ६८ लिंगाच्या भेटीसाठी १६ तासांचा २१ कि.मी मार्गावरून मिरवणूक निघतात.

  • तिसरा दिवस : होमहवन सोहळ्यासाठी हिरेहब्बू वाड्यातून होम मैदान, सिद्धेश्‍वर मंदिर व ६ किलो मीटर अंतर

  • चौथ्या दिवशी : शोभेच्या दारु कामाकरिता हिरेहब्बू वाड्यातून होम मैदान, सिद्धश्‍वर मंदिर व रात्री मल्लिकार्जुन मंदिर ६ कि.मी. अंतर.

  • पाचव्या दिवशी : कप्पडकळ्ळीला हिरेहब्बू वाड्यातून सिध्देश्‍वर मंदिर आणि पुन्हा मल्लिकार्जुन मंदिर ६ कि.मी. अंतर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com